
सस्तेवाडी येथील खून प्रकरणी जय मल्हार क्रांती संघटनेचे ग्रामीण पोलीस ठाण्यास निवेदन
सस्तेवाडी येथील खून प्रकरणी जय मल्हार क्रांती संघटनेचे ग्रामीण पोलीस ठाण्यास निवेदन फलटण (प्रतिनिधी) : फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथे घडलेल्या गणेश बाळू मदने यांच्या खून प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जय मल्हार क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन, फलटण येथे निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, दि. ६ रोजी सस्तेवाडी येथील गरीब कुटुंबातील शेतकरी गणेश बाळू मदने हे त्यांच्या शेतात असताना वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या काही इसमांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात







































