फलटण तालुक्यात दुग्धव्यवसायिकास खंडणीची धमकी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, अद्याप अटक नाही

फलटण तालुक्यात दुग्धव्यवसायिकास खंडणीची धमकी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, अद्याप अटक नाही

फलटण प्रतिनिधी

फलटण (जि. सातारा) : फलटण तालुक्यातील मौजे वडगाव गावाच्या हद्दीत दुग्धव्यवसाय करणाऱ्या युवकास खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भा.न्या.सं. कलम ३०८ (२), ३५१ (२), ३ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मण चंदर जगताप (वय ३६, व्यवसाय – दूध डेअरी, रा. ता. फलटण, जि. सातारा) हे दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराशेजारी असताना आरोपी सुरज उर्फ ढम्या आबासो जाधव व त्यांचे वडील आबासो संपत जाधव (दोघेही रा. वडगाव, पो. बि.बी., ता. फलटण) यांनी त्यांच्याकडे येऊन दुग्धव्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील, अशी मागणी केली.

यावर “पैसे कशासाठी?” असा सवाल केला असता आरोपींनी शिवीगाळ करत, “तुला धंदा व्यवस्थित करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील, अन्यथा तुला व तुझ्या कुटुंबाला जिवंत ठेवणार नाही. पोलिसांत तक्रार दिलीस तर खोटी अ‍ॅट्रोसिटी केस टाकू,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेची तक्रार २३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.४८ वाजता दाखल करण्यात आली. मात्र, या प्रकरणात अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून घटनास्थळी पंचनामा व फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात आले नसल्याचा आरोप तक्रारदाराकडून करण्यात येत आहे.

पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी करीत आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें