जवाहर नवोदय विद्यालयासाठी 18 जानेवारी रोजी प्रवेश परीक्षा

किरण शिंदे – रायगड

दि.16 निजामपूर ता.माणगाव येथील पीएमसी स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाची इयत्ता सहावी साठी प्रवेश परीक्षा 18 जानेवारी 2025 रोजी रायगड जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यातील परीक्षा केंद्रावर होणार आहे. त्यासाठीचे प्रवेश पत्र https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard व https:// navodaya.gov.i वेबसाईटवरून संबंधित उमेदवारांनी डाउनलोड करून घ्यावेत अशी माहिती विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मनोज राऊत यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील परीक्षा केंद्रावर एकूण 2 हजार 374 विद्यार्थी यावेळी इयत्ता सहावी वर्ग पात्रता परीक्षेसाठी बसत आहेत. एकूण 80 जागांसाठी यातून विद्यार्थी निवडले जाणार असून परीक्षा पात्र विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांच्या रजिस्ट्रेशन क्रमांक परीक्षा ओळखपत्रे या https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard व https:// navodaya.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

विद्यार्थी रजिस्ट्रेशन क्रमांक आणि विद्यार्थी जन्मतारीख हे ओळखपत्राचे पासवर्ड असणार आहेत सर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि. 18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. विद्यार्थी आणि पालकांना याबाबत काही माहिती हवी असेल तर त्यांनी संतोष चिंचकर 9881351601 ,अर्जुन गायकवाड 9862793640, वर्षा सावंत 7276008399 यांना संपर्क साधावा.

 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें