१० वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराच्या निषेधार्थ चाळीसगाव येथे नाभिक संघाने केला तीव्र निषेध

१० वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराच्या निषेधार्थ चाळीसगाव येथे नाभिक संघाने केला तीव्र निषेध

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) 

सटाणा तालुक्यातील खमताने येथील १० वर्षीय चिमुरडीवर ७० वर्षीय वृद्धाने केलेल्या अत्याचाराचा निषेधार्थ चाळीसगाव येथे संत सेना नाभिक संघाने तीव्र निषेध केला असून या नराधमाला फाशीची शिक्षा ठोठवावी अशी मागणी निवेदना द्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन बुधवारीदि. 10 रोजी चाळीसगाव तहसीलदार व शहर पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. यावेळी नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सटाणा तालुक्यातील खमताने गावात नाभिक समाजातील १० वर्षीय चिमुरडीवर ७० वर्षीय वृद्ध नराधमाने लैंगिक अत्याचार असून. हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. अशा राक्षसी प्रवृत्तीच्या हैवानांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी व बालीकेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या निवेदनात केली आहे. बालीकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र येत या घटनेचा निषेध केला. यावेळी सकल श्री संत सेना महाराज नाभिक संघ चाळीसगावचे पदाधिकारी व ग्रामीण भागातील वाघडू, सायगाव पिलखोड, देवळी, आडगाव, टाकळी प्र.दे.टाकळी प्र. चा.उंबरखेड, येथील नाभिक समाज बांधव उपस्थित होते. मागणीचे निवेदन चाळीसगाव तहसीलदार व शहर पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

जुनासुर्ला अत्याचार प्रकरणी दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाईची मागणी: 👉 मुल पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन  👉 कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी. 

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal