साक्री येथील भूमी अभिलेख कार्यालयातर्फे आजी व माजी सैनिकांचा सत्कार.

साक्री येथील भूमी अभिलेख कार्यालयातर्फे आजी व माजी सैनिकांचा सत्कार.

साक्री: – साक्री तालुका प्रतिनिधी श्री विलासराव पाटील.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून साक्री येथील भूमी अभिलेख कार्यालयातर्फे आजी व माजी सैनिकांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी साक्री येथील भूमि अभिलेख, कार्यालयाकडून तालुक्यातील भारतीय सैन्यदलातील आजी व माजी सैनिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी आमंत्रित करण्यात आलेल्या भारतीय सैन्यदलातील कार्यरत सैनिक आणि सेवानिवृत्त माजी सैनिकांचा श्री.कुंदन परदेशी, उप अधीक्षक भूमि अभिलेख, साक्री यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, प्रेरणादायी पुस्तके व वृक्षारोपणासाठी रोपटे देऊन गौरव करण्यात आला. 

भारतीय सैन्यदलातील सैनिकांच्या देशसेवेप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन श्री.कुंदन परदेशी यांनी यावेळी केले. 

याप्रसंगी तालुक्यातील माजी सैनिक श्री.संजय अहिरराव, श्री.सुकदेव घरटे, श्री.लक्ष्मण सौंदाने, श्री.लोटन घुगे, श्री.रणजीत कुंवर, श्री.सुरेश खैरनार, श्री.गंगाधर भदाणे, श्री.रवींद्र ठोके, श्री.संजय चौधरी, श्री.उमेश मोरे, श्री.महारू नेरे, श्री.हंसराज पाटील, श्री.भटू अहिरराव, श्री.संजीव राठोड, श्री.भटू गांगुर्डे, श्री.संजय भदाणे, श्री.अभिजित काकुस्ते, श्री.महेश क्षीरसागर व श्री.रोहित पाटील यांचा कार्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूमी अभिलेख कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री अमोल महाजन साहेब यांनी मांडले व कार्यक्रमाचे आभार माजी सैनिक श्री रविंद्र ठोके व श्री संजय अहिरराव यांनी मानले.

या कार्यक्रमास वृक्षमित्र श्री.सुभान पिंजारी, पत्रकार श्री.आबासाहेब सोनवणे, श्री.अमोल महाजन, श्री.जितेंद्र पाटील, श्री.सोहम वंजारी, श्री.उदयसिंग पावरा व उप अधीक्षक भूमि अभिलेख, साक्री कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

साक्री तालुका प्रतिनिधी श्री विलासराव पाटील.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें