विनोद डॉक्टर आहे की हैवान❓बेटी पढी पर बची नही.
👉 स्त्रिलंपट डॉ विनोद म्हशाखेत्री सारख्या हरामखोर डॉक्टर आणि काही कर्मचाऱ्यांचे नांव समोर येणार!!
👉 प्रशासनाने बडतर्फ करून एसआयटी माफऺत सर्व चौकशी करावी.
👉 आरोपीला पकडण्यात पोलीसांना अजूनही यश नाही ❓
नागपूर /( चक्रधर मेश्राम) दि 11/12/2025:-
कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण सुरूच आहे ❓अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आता संघटनेचे पदाधिकारी झोपी गेले का❓ संपूर्ण महाराष्ट्रात अन्यायग्रस्त आरोग्य महिला कर्मचाऱ्यांचे अनेकविध प्रश्न असुन मानसिक आणि आर्थिक शोषण झाले आहे. शारीरिक शोषणही झाले आहे. अशा अनेक ठिकाणी घटना घडल्या असुन विनोद म्हशाखेत्री लबाड डॉ. विनोद म्हशाखेत्री सारख्या हैवान आणि स्त्रीलंपट डॉक्टरांचे नाव लवकरच समोर येणार आहे..महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचे शोषण अनेक ठिकाणी बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. त्यात सबंधित विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ कर्मचाऱ्यांसह अधिकारी गुंतले असल्याचे चर्चिले जात आहे. अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे. हैवान विनोद म्हशाखेत्री यांनी केलेल्या कृत्याचा सर्व स्तरावर निषेध केला जात आहे. आरोपी फरार असून अजुनही पोलीसांना गवसला नसल्याने पाणी कुठेतरी मुरत आहे. अशा चर्चा जिल्हा परिषद गडचिरोली परिसरात सुरू आहेत. या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील हैवान, नरभक्षक, लंपट, लुटारु डॉक्टरांचे नाव लवकरच समोर येणार आहे.
अनेक वर्षांपासून समायोजनाच्या प्रतिक्षेत असलेल्या आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अनेकविध समस्या सोडविण्यासाठी नालायक, बेशरम राज्य शासनाला यश आले नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. महाराष्ट्र राज्यात हजारो कंत्राटी आरोग्य कर्मचारी अल्पशा मानधनावर काम करीत आहेत. तरीही समायोजन करण्यात आले नाही. समायोजनाच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण झाले असल्याचे स्त्रिलंपट डॉ. विनोद म्हशाखेत्री यांनी केलेल्या नालायकपणाच्या कृत्यावरुन स्पष्ट झाले आहे.
तालुका आरोग्य अधिकारी विनोद म्हशाखेत्री यांच्या नियुक्ती झालेल्या प्रत्येक ठिकाणी एस आय टी च्या माध्यमातून तपास कार्य सुरू करण्यात यावे. डॉ. शशिकांत शंभरकर हे गडचिरोली जिल्हा परिषद येथे जिल्हा आरोग्य अधिकारी असताना डॉ विनोद म्हशाखेत्री यांनी अनेक प्रकारचे घबाड केले आहे. तेही आता हळूहळू उघडकीस येत आहेत. डॉ. शशिकांत शंभरकर हे नागपूर विभाग नागपूर या उपराजधानीत आरोग्य उपसंचालक पदावर असल्याने हैवान विनोद म्हशाखेत्री यांना वाचवण्यासाठी उच्च स्तरावर प्रयत्न करीत आहेत का❓ अशा चर्चेला आता पेव फुटला आहे .
दिनांक ६ डिसेंबर पासून आरोपीला पकडण्यात गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनाला यश आले नाही. हि एक प्रकारची पोलीस प्रशासनाला लाजविणारी बाब आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विनोद म्हशाखेत्री यांनी डॉ. शशिकांत शंभरकर जिल्हा आरोग्य अधिकारी असतांना अवैध पद्धतीने लाखो रुपये कमविले असल्याची चर्चा सुरू आहे. या कार्यकाळात डॉ. विनोद म्हशाखेत्री हे सहाय्यक आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. या कालावधीत झालेल्या अनेक ठिकाणी झालेल्या अन्याय कारक बाबींची माहिती चर्चेच्या माध्यमातून आता समोर येत आहे. त्यात अनेक डॉक्टरांचा आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. डॉ विनोद म्हशाखेत्री यांनी सिस्टर, मलेरिया वर्कर, सिएचओ, डॉक्टर यांच्या नियुक्ती आणि बदली प्रकरणात अमाप पैसे कमविले असल्याची चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे. विनोद हा डॉ. शशिकांत शंभरकर यांचा लंगोट यार होता.? डॉ. विनोद म्हशाखेत्री यांनी अनेक ठिकाणी असेच कृत्ये केल्याचीही चर्चा सुरू आहे.
मुलचेरा तालुक्यातील कंत्राटी महिला आरोग्य सेविकेच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागे दोन वर्षांचा लैंगिक छळ झाला.
कार्यरत कंत्राटी महिला आरोग्य सेविकेने (C-ANM) केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाने संपूर्ण आरोग्य यंत्रणेला हादरवून सोडले .
या घटनामागील कारणे उघड झाल्यानंतर आरोग्य विभागात तीव्र संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.या सर्व प्रकरणाच्या मुळाशी गेले असता, अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कंत्राटी नोकरीचा अडथळा निर्माण करू, फाईल पुढे सरकवू किंवा थांबवू, वरिष्ठांकडे तुमच्या विरोधात अहवाल देऊ, अशा सूचनांमधून त्यांनी आपला प्रभाव वापरून पीडितेवर मानसिक दबाव वाढवला. आणि शारीरिक शोषण केले. या छळामुळे तिची मानसिक अवस्था एवढी बिघडली की तिने अखेरीस आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
घरीसुद्धा दडपलेल्या भीतीमुळे सामान्य आयुष्य जगू शकत नव्हती.कोणाला काही सांगितल्यास नोकरीवर गदा येईल, शेवटी तीने मानसिक ताणाला न जुमानता विष प्राशन करून कोसळली. पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत 8 डिसेंबर 2025 रोजी FIR नोंदवली. भारतीय न्याय संहिता कलम 75(2) (छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि कलम 78(2) (पदाचा गैरवापर करून जबरदस्ती) यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीही पुन्हा सखोल तपास करून गुन्ह्याच्या वाढविण्यात यावे.
पोलिसांकडून तिच्या मोबाईल फोनची तपासणी,कॉल रेकॉर्ड्स, संदेश, व्हॉट्स’अप चॅट, तसेच या कालावधीत घडलेली सर्व पत्रव्यवहाराची पडताळणी करण्यात येत आहे. याचबरोबर संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांची किंवा उपस्थितांनी दिलेल्या माहितीचीही नोंद घेतली जात आहे.
मागील काही वर्षांत महिला आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांकडून होणाऱ्या गैरवर्तनाच्या तक्रारी वेळोवेळी समोर येत आहेत. कंत्राटी नोकरीतील अस्थिरता, कधीही नोकरी जाण्याची भीती आणि वरिष्ठांच्या शक्तीचा गैरवापर यामुळे महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी असुरक्षिततेचा सामना करावा लागतो, अशी व्यापक चर्चा देखील सुरू आहे. सैनिक समाज पार्टीच्या वतीने याबाबत तातडीने उच्चस्तरीय चौकशीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आरोग्यमंत्री यांचेकडे केली आहे.
पीडिता आणि तिच्या कुटुंबावर झालेला हा मानसिक आणि आर्थिक आघात प्रचंड आहे आणि न्याय मिळेपर्यंत त्यांची अवस्था अधिकच वेदनादायी राहणार आहे.
या प्रकरणाने आरोग्य विभागातील स्त्री सुरक्षा,कंत्राटी कर्मचाऱ्यांची स्थिती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या संभाव्य गैरवर्तनाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत .या प्रकरणातून पुन्हा. नवनवीन कोणते सत्य बाहेर येते? ,आरोपीवर काय कारवाई होते? आणि आरोग्य विभाग भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना कसे आळा घालतो, हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.













