कोरपणा शहरातील अतिक्रमण हटविले आता अवैद्य चार चाकी वाहने हटणार का?

कोरपणा शहरातील अतिक्रमण हटविले आता अवैद्य चार चाकी वाहने हटणार का?

कोरपणा तालुका प्रतिनिधी मनोज गोरे

 अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळेच शहरातील रस्ते मोकळे झाले असले तरी त्याच रस्त्यांवर अवैद्य चार चाकी वाहने राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली रस्त्यांवर अवैद्य वाहनाची मोठी गर्दी पुन्हा वाहतूक यंत्रणेच्या कार्यक्षमतेंवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत वृत्त संकलन करणाऱ्या प्रतिनिधींकडून केलेल्या पाहणीतून हे विदारक चित्र समोर आले असून कोरपणा बस स्थानक चौक हा चौफुली चा मार्ग असल्याने वाहनाची मोठी गर्दी दिसून येतो रस्त्याच्या मध्ये उभे राहून प्रवासी भरले जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो या ठिकाणी प्रवाशांना उभे राहण्याकरिता प्रवासी निवाराच नाही रस्त्यावरच प्रवाशांना उभे राहून बसची वाट पाहत राहावे लागते दुकानासमोरील साहित्य रोडवर ठेवून विक्री करण्याकरिता रस्त्यांचा वापर केला जातो त्यामुळे शहरात येणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा संबंधित नगरपंचायत च्या विभागांनी रस्त्यावरील दुकानदारांना नोटीस देऊन ते हटविण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहेत कोरपणा वाहतूक पोलीस मात्र भंग्याची भूमिका घेतात यावर भर घालत काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांची उधळपणा शिवीगाळ वादविवाद हे प्रकार सुरू आहेत महिलांसाठी हे विशेष सुरक्षिततेचे कारण ठरत आहे प्रवाशांची निष्क्रियता आणि ट्राफिक विभागांचे डोळेझाक धोरण या अराजकतेना खतपाणी घालत आहे. अतिक्रमणाविरोधी कारवाई सारखी मोहीम अवैद्य वाहतुकी विरोधात कधी राबणार? केवळ रस्ते मोकळे करून उपयोग नाही ते प्रदूषण मुक्त करणे हीच तितकेच गरजेचे आहेत नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहे. आणि प्रशासन ने आता केवळ पाहणी न करता ठोस कृती करणे गरजेचे आहे वृत्त संकलन करणाऱ्या प्रतिनिधींनी दाखवलेला आरसा स्वीकारून शहराच्या वाहतूक विभागांनी आराखड्यांची नवी आखणी करणे ही काळाची गरज बनली आहे.

—————————————–

 *कोरपणा शहरांमध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम यशस्वी ठरल्यानंतर आता नागरिकांचा रोख अवैद्य वाहतुकीवर वडला आहे नियमबाह्य वाहतुकीतून प्रदूषणकारी वाहनांकडे वडला आहे सायलेन्सर धूळ आणि गोंगाटामुळेच नागरिक हैराण झाली असून जशी टपऱ्यांवर कारवाई झाली तसेच धडक मोहीम अवैद्य चार चाकी वाहनांवर राबवावी व दुचाकी वाहनांना पार्किंगची व्यवस्था करून देण्यात यावी आता याकडे प्रशासन या समस्येकडे किती गांभीर्याने बघते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

—————————————-

शहरातील काही व्यापाऱ्यांची अजूनही अतिक्रमण म्हटले नाहीत त्यांना लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद तर नाही ना? अशा विविध विवचनेत, जनसामान्य नागरिक कडून बोलल्या जात आहे. अशा व्यापाऱ्यांचा नगरपंचायतने तात्काळ अतिक्रमण हटवावे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें