अर्णव चौधरी भारत प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव ) : – पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, चाळीसगाव येथील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी चि. अर्णव भुषण चौधरी याने नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या आय. टी. एस. सी. (भारत प्रज्ञाशोध परीक्षा) मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अर्णवने 200 पैकी 188 गुण मिळवत जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला आहे. अर्णव हा साहेबराव सुपडू चौधरी वाडेकर यांचा नातू असून, भुषण चौधरी (माध्यमिक विद्यालय, पातोंडा) आणि सौ. पुनम चौधरी (जि.प. शाळा, टेकवाडे बुद्रुक) यांचा सुपुत्र आहे.
Author: AVB Majha
Post Views: 481










