समाजकल्याण विभागाच्या चाळीसगाव येथील मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश देणे सुरु
चाळीसगाव प्रतिनिधी :- सन2025-26 या शैक्षणिक वर्षात मागासवर्गीय तथा आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह चाळीसगाव येथील वसतीगृहात चाळीसगाव व परिसरातील शैक्षणिक संस्था मध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसुचित जाती व नवबौध्द, अनु. जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागासवर्ग, अनाथ, दिव्यांग या प्रवर्गातील जातीनिहाय आरक्षण निश्चित केल्या नुसार प्रवेशासाठी रिक्त असलेल्या जागेवर विनामुल्य प्रवेश देणे सुरु असुन इयत्ता 8वी पासुन पुढील शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षात प्रवेशीत विद्यार्थ्यांनींना प्रवेश देणे सुरु असुन पाञ विद्यार्थ्यांनीनीं तात्काळ https://hmas.mahait.org या आॕनलाईन लिंकवर प्रवेश अर्ज भरल्यावर डाउनलोड किंवा स्क्रीनशाॕट झेराॕक्स काढुन वसतीगृहात जमा करुन नोंद करुण आपला प्रवेश निश्चित करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
*सुविधा:-*
1) निवास- भोजन
2)ड्रेस कोड गणवेश खर्च
3)शै.साहित्य खर्च
4)रेनकोट गमबुट खर्च
5)प्रोजेक्ट खर्च
6)शै.सहल खर्च
7)दरमहा 600 निर्वाह भत्ता इ.संपर्क साठी मागासवर्गीय तथा आर्थिक दृष्ट्या मागासवर्गी मुलींचे शासकीय वसतीगृह रेल्वे लाईन, शासकीय ITI जवळ चाळीसगाव येथे संपर्क साधावा
अधिक माहितीसाठी संपर्क -गृहपाल :सागर विशे सर-7021413970,
तालुका समन्वयक(समाजकल्याण तथा बार्टी)-अनिल पगारे-9766393553,
क.लि-अनिता तोंडे-8999522753
समतादुत(बार्टी)-जयस्ञी चौधरी-8421571092













