सर्वोदय माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
तालुक्यातील धामणगाव येथील
सर्वोदय माध्यमिक विद्यालयात स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी, व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, प्रतिमापूजन मुख्याध्यापक एस.पी. मोरे यांनी केले. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबाबतची माहिती विद्याथ्यांनी आपल्या मनोगतातून दिली, तसेच मुख्याध्यापक एस.पी. मोरे आणि अमर पाटील यांनीही सावित्रीबाई फूले यांच्या जिवनावर माहिती दिली. यावेळी पालक शिक्षक सभेचे अध्यक्ष पंकज पवार, उपाध्यक्ष विनोद जगताप, माजी उपाध्यक शिवाजी मोरे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. यावेळी वाल्मीक निकम, प्रशांत सौंदाणे, सतीश मोरे, भागवत चव्हाण, रवींद्र पवार, संदीप पवार, लक्ष्मण पवार आदी पालक वर्ग हजर होते. कार्यक्रमात आलेल्या पालकांनी भाषणात सहभागी विदयार्थ्यांना पेन्सिल बॉक्स बक्षिस म्हणून दिले. पालकांच्या उपस्थितीत अधिवास दाखले, जातीचे दाखले व पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांना मूल्यवर्धित पुस्तकांचे वाटप करण्यात आले, या प्रसंगी पालक वर्ग, शिक्षक बंधू भगिणी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.डी. पवार यांनी केले. तर आभार व्हि.बी. अहिरे यांनी मानले.













