बेरोजगारी हटवण्यासाठी ग्रामीण विकास मिशन संस्थेचा पुढाकार : अधिकराव जगताप देशमुख.
प्रतिनिधी :
संपूर्ण महाराष्ट्र सध्या बेरोजगारी वाढत चालली आहे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, याकरता आमच्या ग्रामीण विकास मिशन संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात उद्योग उभा करून एक लाख रोजगार निर्मिती करणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अधिकराव जगताप यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी जगताप पुढे बोलताना मला की या संस्थेचे तेलंगणा, बिहार, गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्रभर काम जोराने सुरू आहे. यापुढे संस्थेच्या माध्यमातून एक गाव एकच उद्योगाचे मिशन राबवणार असून यामध्ये जास्त फायदा लोकांना मिळणार आहे.
यामध्ये रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत अभियान, जलसंवर्धन उपक्रम, महिला सक्षमीकरण, तसेच स्वयंरोजगार निर्मिती यांसारख्या विषयांवर विशेष भर देण्यात येत आहे. पाणीटंचाई, रस्ते दुरुस्ती, रोजगाराच्या संधी, आरोग्य, शिक्षण, कृषी आणि शेतीपूरक व्यवसाय याबाबतीत उपाययोजना व उपक्रम सुरु आहेत
केंद्र व राज्य शासनाच्या योजना केवळ कागदावर मर्यादित न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ गावाच्या विकासासाठी झाला पाहिजे. यासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. विविध योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि लाभ मिळविण्याचे निकष आणि प्रत्यक्ष काम याबाबतही ग्रामपंचायत आणि नागरिकांमध्ये जागरूकता असणे गरजेचे असल्याचं जगताप यांनी यावेळी सांगितले.
लोकानी जास्तीत जास्त योजनांचा फायदा मिळवण्यासाठी स्थानिक पदाधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन जगताप यांनी केले.











