धुळ्यात छापील कागदात खाद्यपदार्थ देणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई.

धुळ्यात छापील कागदात खाद्यपदार्थ देणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई.

प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे.

धुळे – ग्राहकांना खाद्यपदार्थ देण्यासाठी छापील वृत्तपत्रांचा (रद्दीचा) वापर करणे आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याने अन्न व औषध प्रशासनाने धुळे शहरात धडक तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत साक्री रोड, वाडीभोकर रोड आणि देवपूरमधील दत्त मंदिर परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली.

​छापील वृत्तपत्रांच्या शाईमध्ये शिसे आणि कॅडमियमसारखे विषारी घटक असतात. गरम किंवा तेलकट पदार्थ या कागदात दिल्यास हे रासायनिक घटक अन्नात मिसळून आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. अन्न सुरक्षा व मानके नियम २०१८ नुसार छापील कागदाचा वापर प्रतिबंधित आहे. असे असतानाही अनेक व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे या तपासणीत उघडकीस आले.

​संबंधित व्यावसायिकांना छापील कागदाचा वापर तत्काळ बंद करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले असून, त्यांच्यावर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अन्वये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सर्व विक्रेत्यांनी ग्राहकांच्या आरोग्याशी न खेळता बटर पेपर, फूड-ग्रेड पाकीट किंवा सुरक्षित पॅकेजिंगचाच वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें