रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी-संगम चाळीसगावचा पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा

रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी-संगम चाळीसगावचा पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा

चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :- 

 रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी संगमचा २४वा पदग्रहण सोहळा 26 रोजी संपन्न झाला. यावेळी रोटरी वर्ष २०२६-२७ साठी शिक्षक शालिग्राम निकम यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तर सेवानिवृत्त शिक्षक अविनाश करंकाळ यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मंगेश चव्हाण होते. निलेश परतानी, भरत सिनकर, यांची उपस्थिती मौलिक होती. यावेळी मावळते अध्यक्ष श्रीकृष्ण अहिरे यांनी आपल्या रोटरी वर्षाचा लेखाजोखा सादर करून आपला अध्यक्षपदाचा पदभार नवनिर्वाचित अध्यक्ष शालिग्राम निकम यांच्याकडे तर सचिव भालचंद्र दाभाडे यांनी आपला कार्यभार अविनाश करंकाळ यांचेकडे सुपूर्द केला. यावेळी नवीन कार्यकारिणी गठित करून कार्यान्वीत करण्यात आली आहे. यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ऑफिसर पदी निवड झाल्याबद्दल रवींद्र शिरुडे, सुधीर पाटील, मेघा बक्षी व प्रकाश कुळकर्णी यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. २०२६-२०२७ च्या कार्यकारिणीत नूतन रोटेरियन म्हणून प्रा एम. बी. लाड, नगरसेवक भावेश कोठावदे, उद्योजक परमानंद अमृतकार, केंद्रप्रमुख जयप्रकाश चौधरी, सुभाष महाले, करणसिंग पवार, आनंदा साळुंखे, सतिष देव, संदेश येवले, वैशाली वाघ, विवेक बागल, विजय चौधरी, स्वप्निल पाटील, तुषार पवार व राजेंद्र मुंदडा अशा १५ नवीन रोटेरियन्सची निवड करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष दीपक पाटील सर व श्रीमती मेघा बक्षी मॅडम यांनी केले . यावेळी रोटरीचे पदाधिकारी लालचंदजी बजाज, ओमप्रकाश शर्मा, आनन शिंपी, डॉ .संतोष मालपुरे, आधार महाले, डॉ. भाग्यश्री शिनकर, बालाप्रसाद राणा, चंद्रकांत पाटील, संजय सोनवणे, राजेंद्र छाजेड, कुणाल रुईकर, डॉ.प्रशांत शिनकर, निगार चव्हाण, मनीषा शिरुडे, ज्योत्सना अहिरे, रमेश पोतदार आदी उपस्थित होते. यावेळी विशेष रोटरी भूषण “पर्यावरण रत्न ” पुरस्काराचे वितरण करण्यात आले रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम व स्वागत सेवालाय चाळीसगावच्या वतीने वृक्षमित्र सोमनाथ भाऊ माळी रा. ब्राह्मणशेवगे यांचा सन्मानपत्र शाल व बुके देऊन आमदार मंगेश चव्हाण व रविंद्र शिरुडे यांचे हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार नुतन सचिव अविनाश करंकाळ यांनी मानले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें