माथाफाटा येथे वाहन अपघात; पत्रकार रवि बंडीवार जखमी
कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे :
माथाफाटा परिसरात झालेल्या वाहन अपघातात पत्रकार रवि बंडीवार जखमी झाले. 12 जूनला शुक्रवारला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान त्यांचे वाहन अचानक अनियंत्रित होऊन पलटी झाल्याची माहिती मिळाली.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर डॉ. दुदलवार यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असून गंभीर दुखापत झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच अधिक तपासणीसाठी एक्स-रे व सिटीस्कॅन करण्यात येणार असून पुढील वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार केले जाणार आहेत. अपघाताची माहिती मिळताच पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व मित्रपरिवाराने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असून लवकर बरे व्हावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.











