एसटी कर्मचाऱ्यांची परिवहन मंत्र्यांकडे तक्रार; वरिष्ठ अधिकाऱ्यावर मानसिक छळाचे गंभीर आरोप

एसटी कर्मचाऱ्यांची परिवहन मंत्र्यांकडे तक्रार; वरिष्ठ अधिकाऱ्यावर मानसिक छळाचे गंभीर आरोप

फलटण : फलटण एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मानसिक छळ, दमदाटी आणि अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप करत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

कर्मचाऱ्यांच्या निवेदनानुसार, सहाय्यक वाहतूक नियंत्रक सुखदेव अहिवळे हे कर्मचाऱ्यांना वारंवार दमदाटी करतात, नोकरीची धमकी देतात तसेच अपमानास्पद भाषेत बोलतात. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आगारातील कामकाजावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यापूर्वीही आगार व्यवस्थापक, तहसीलदार, शहर पोलीस ठाणे आणि सातारा विभाग नियंत्रक यांच्याकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या. मात्र, कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संबंधित अधिकारी अधिकच बिनधास्तपणे वागत असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

“तुमची नोकरी कशी करता ते पाहतो”, “माझी प्रशासनात मोठी ओळख आहे”, अशा प्रकारच्या धमक्या देत मानसिक दबाव टाकला जात असल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे करण्यात आली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें