फलटण नगरपरिषदेत खासदार गटाची एक हाती सत्ता ; सर्व समित्या बिनविरोध ताब्यात

फलटण नगरपरिषदेत खासदार गटाची एक हाती सत्ता ; सर्व समित्या बिनविरोध ताब्यात

फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषदेच्या स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांचे सभापती गठित करण्यासाठी आज (गुरुवार) आयोजित करण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा राजकीयदृष्ट्या अत्यंत लक्षवेधी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अपक्ष नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीस (खासदार गट) खुला पाठिंबा दिल्याने, पालिकेच्या सर्व विषय समित्यांचे सभापती व उपसभापती पदांच्या निवडी ‘बिनविरोध’ पार पडल्या आहेत. या निवडींमुळे नगरपालिकेवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील ‘खासदार गटा’चे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

ही विशेष सभा पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी निखील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

*असे आहेत फलटण नगरपरिषदेचे नवे ‘सभापती’ :*

नगरपरिषदेचा गाडा हाकणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या विषय समित्यांवर खासदार गटाने अनेक अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. सर्व समित्यांच्या सभापतींची यादी खालीलप्रमाणे:

 * सार्वजनिक बांधकाम समिती सभापती : ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सोमाशेठ जाधव.

 * शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती : उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले (पदसिद्ध सभापती).

 * स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती : सचिन अहिवळे.

 * पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती सभापती : राहुल निंबाळकर.

 * नियोजन व विकास समिती सभापती : संदिप चोरमले.

 * महिला व बालकल्याण समिती : सभापती – सौ. मोहिनी मंगेश हेंद्रे, उपसभापती – सौ. कांचन दत्तराज व्हटकर.

 * मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समिती सभापती : सौ. सुपर्णा सनी अहिवळे.

*स्थायी समितीत कोणाची लागली वर्णी?*

नगरपालिकेची सर्वाधिकार संपन्न ‘स्थायी समिती’ अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर कामकाज पाहणार आहेत, तर सर्व विषय समित्यांचे नवनिर्वाचित सभापती हे या समितीचे पदसिद्ध ‘सदस्य’ असणार आहेत.

याशिवाय, सभागृहातून भाजपचे गटनेते रोहित नागटिळे, नगरसेवक अशोकराव जाधव आणि राजे गटाचे गटनेते पांडुरंग गुंजवटे (आबा) यांची स्थायी समितीचे सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.

*सभेतील दोन लक्षवेधी राजकीय घडामोडी:*

१) *सभागृहात दिसले राजकीय सौहार्द; नगराध्यक्षांनी राखला ‘आबां’चा मान!*

आजच्या विशेष सभेत एका वेगळ्याच राजकीय संस्कृतीचे दर्शन फलटणकरांना पाहायला मिळाले. सभेला सुरुवात झाल्यानंतर विरोधी राजे गटाचे गटनेते पांडुरंग गुंजवटे (आबा) हे नगरपालिकेच्या सभागृहात शेवटच्या रांगेत जाऊन बसले होते. ही बाब लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ आबांच्या ‘ज्येष्ठत्वाचा’ आणि अनुभवाचा मान राखत त्यांना पहिल्या रांगेत येऊन बसण्याची सन्मानपूर्वक विनंती केली. पांडुरंग गुंजवटे यांनीही नगराध्यक्षांची ही विनंती मोठ्या मनाने स्वीकारली आणि ते शेवटच्या रांगेतून थेट पहिल्या रांगेत येऊन विराजमान झाले. या प्रसंगामुळे सभागृहातील वातावरण खेळीमेळीचे झाले.

२) *अनिकेतराजे आणि उपनगराध्यक्षांच्या अनुपस्थितीने उंचावल्या भुवया!*

संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या या महत्त्वाच्या सत्तावाटपाच्या सभेला उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले आणि ‘राजे गटा’चे स्वीकृत नगरसेवक युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर हे दोघेही अनुपस्थित राहिले. त्यांच्या या अनपेक्षित अनुपस्थितीमुळे पालिकेच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, यामागे नेमके काय राजकीय समीकरण आहे? याची जोरदार चर्चा शहरात रंगू लागली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal