प्रदेश भाजप कोर कमिटी कडून राज्यसभेसाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह पंचवीस जणांची शिफारस

प्रदेश भाजप कोर कमिटी कडून राज्यसभेसाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह पंचवीस जणांची शिफारस

फलटण  प्रतिनिधी- महाराष्ट्रात राज्यसभेची लवकरच निवडणूक होत असून माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह 25 जणांच्या नावांची शिफारस प्रदेश भाजप कोअर कमिटीने केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे.

 भाजप कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा पार पडली यामध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी 25 जणांच्या नावांची शिफारस करण्यात आली या शिफारशी मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पण नावाची शिफारस केंद्रीय नेतृत्वाकडे करण्यात आली आहे. माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी यापूर्वी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभा सदस्य झाले होते मात्र मागील लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता मात्र या पराभवाने खचून न जाता त्यांनी विधानसभेला आमदार सचिन पाटील यांना निवडून आणले तसेच फलटण नगरपालिकेत तब्बल 33 वर्षानंतर सत्तांतर घडवीत भाजपची सत्ता आणली. फलटण पंचायत समितीमध्ये प्रथमच आठ सदस्य निवडून आणले आहेत. अद्याप सभापती पदाची निवडणूक बाकी आहे. यापूर्वी पक्षाने त्यांच्यावर ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या त्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणूक जाहीर होताच त्यांच्या नावाची चर्चा कार्यकर्त्यामध्ये सुरू झाली होती आता भाजप कोअर कमिटीनेच त्यांच्या नावाची शिफारस केल्याने त्यांनाच उमेदवारी भेटेल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें