धुळे एलसीबीची मोठी कारवाई; तीन लाखांचा 12 किलो गांजा जप्त, दोन आरोपी ना अटक.

धुळे एलसीबीची मोठी कारवाई; तीन लाखांचा 12 किलो गांजा जप्त, दोन आरोपी ना अटक.

प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे 

धुळे स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 12 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

व्हीओ धुळे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धुळे शहरातील अंटोदा बुद्रुक परिसरातील विक्रमी भवनाजवळ सापळा रचण्यात आला.

यावेळी संशयित निखिल गोकुळ पाटील आणि चेतन पवार यांच्या ताब्यातून लाखो रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली एमएच-18 बीके-0311 क्रमांकाची दुचाकीही जप्त करण्यात आली. या कारवाईत 3 लाख रुपयांचा गांजा, 50 हजार रुपयांची दुचाकी, असा एकूण 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे,

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें