संस्कार भारती आयोजित कथाकथन स्पर्धा उत्साहात संपन्न
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) : –
येथील एच. एच. पटेल विद्यालयात दि.२१ रोजी शालेय विद्यार्थ्यासाठी कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली, जवळपास १० शाळांनी व १५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला, कार्यक्रमाची सुरुवात नटराज पुजनाने झाली देवगिरी प्रांत उपाध्यक्षा सुनिता घाटे, अध्यक्ष गितेश कोटस्थाने, प्रायोजक रजनी देशपांडे, प्रांतमंत्री रविंद्र देशपांडे, डॉ. नरेश निकुंभ, मंचीय कला संयोजक शालिग्राम निकम, शुभांगी संन्यासी, सुनिल पाटील यांच्या हस्ते नटराज पुजन करण्यात आले. प्रास्तविक अध्यक्ष गितेश कोटस्थाने यांनी केले, संयोजन रत्नमाला नेरकर यांनी केले, विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्राफी, प्रशस्तीपत्र व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. नरेश निकुंभ, शुभांगी संन्यासी, संयोगिता शुक्ल, रजनी पाटील यांनी काम पहिले, सुत्रसंचलन शालिग्राम निकम व शीघ्रकवी रमेश पोतदार यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष शंकर पाठक यांनी मानले, यशस्वीतेसाठी आधार महाले, सचीव प्रकाश कुळकर्णी, कोषाध्यक्ष दिलीप संन्यासी, सुहासिनी देशपांडे, मनिषा देशपांडे, श्यामल कोटस्थाने यांनी परिश्रम घेतले.
*स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे*
*बालगट*
प्रथम : किमया बोंबिडकर, एच. एच. पटेल विद्यालय
द्वितीय : गौरी निकम,
प्रमिलाताई पुर्णपात्रे विद्यालय
तृतीय : अंतरा ब्राह्मणकार,
एच. एच.पटेल विदयालय
उत्तेजनार्थ : कार्तिक भोई, श्रावणी पाटील, अमित चौधरी
*लहान गट*
प्रथमः शाश्वत पाटील, ता.सां.मां. विद्यालय
द्वितीय : वेदेश बिरारी, ए.बी. मुलाचे हायस्कूल
तृतीय : प्रांजल अहिरे, प्रमिला ताई पुर्णपात्रे मा. विद्यालय
उत्तेनार्थ : कादंबरी पाटील, हर्षदा उदावंत, खुशाल अहिरे
*मोठागट*
प्रथमः देवेंद्र पाटील, आ.बं. मुलांचे हायस्कूल
द्वितीय : ओम मोरे, आ .बं. मुलांचे हायस्कूल
तृतीय : अर्णव उपासनी, गुडशेफर्ड ॲकेडमी स्कूल
उ त्तेजनार्थ : समिक्षा पवार













