आनंदीबाई बंकट मुला-मुलींची शाळेत सदगुरू निर्मित विश्वप्रार्थना फलकाचे अनावरण

आनंदीबाई बंकट मुला-मुलींची शाळेत सदगुरू निर्मित विश्वप्रार्थना फलकाचे अनावरण

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) 

जीवनविद्येचे शिल्पकार सदगुरु श्री वामनराव पै, यांच्या ९६०००/-इतक्या ग्रंथाचे वितरण चाळीसगाव येथे जीवनविद्या मिशनच्या वतीने करण्यात आले यावेळी सदगुरु निर्मित विश्वप्रार्थना फलकाचे अनावरण दि २० रोजी आनंदीबाई बंकट मुला मुलींची शाळेत मुख्याध्यापक शरद जाधव ह्यांच्या हस्ते करण्यात आले. अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करुन त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवरचने, ग्रंथ निर्मिती, व्याख्याने, ध्वनीफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादी द्वारे समाज प्रबोधनाचे कार्य केलेले आहे.

जीवनविद्येचे शिल्पकार सदगुरु वामनराव पै यांनी सन १९५२ पासून समाजप्रबोधनाची चळवळ उभी केली असून हे कार्य जीवनविद्या। मिशन मार्फत सातत्याने सुरू आहे. दरम्यान, नवी मुंबईहून आलेल्या सदगुरूंच्या २५ स्त्री-पुरुष नामधारकांनी राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात १६ फेब्रुवारीपासून चाळीसगावात सद्‌गुरु निर्मित ग्रंथांचे ज्ञानदान केले. या पथकात आत्माराम कोयंडे, सुनीता सोनवणे, रघुनाथ पाटील, भानुदास केसरकर, सुशीला केसरकर, सहदेव शिंदे, सुजाता शिंदे, दिनकर बडेकर, तेजश्री महिमकर, सुहास मांजरेकर, ललिता जाधव, मनीषा तांबोळी, प्रफुल्ल खंडारे, प्रज्ञा खंडारे, अपर्णा घाडी, प्रज्ञा शेटे, अलका पोखरकर, शशिकला चतुर, शीतल शिंदे, लक्ष्मीकांत शिंदे आणि अशोक बहाळकर यांचा समावेश होता. या काळात त्यांनी शहरातील विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना राष्ट्रभावना, अभ्यासातील सातत्य, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकास याबाबत मार्गदर्शन केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें