देवळी आश्रमशाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक मुख्याध्यापक तुषार खैरनार हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक मुख्याध्यापक सतिष पाटील व अधिक्षक विनोद देसले यांनी दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन केले. कार्यक्रमात पोवाडा, गायन, नाटक, लेझीम पथक, ढोल पथक, नृत्य सादर करण्यात आले रमाकांत कापडणीस यांनीही गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन सूर्यवंशी यांनी केले, शिवरायांचे शिवचरित्र राजू पाटील, शाळेतील विद्यार्थी राधिका पावरा यांनी मांडले. कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते, सूत्रसंचालन सचिन पाटील यांनी तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले.













