नवसाक्षरता कार्यक्रमास चाळीसगावच्या कलावंतांचा राज्यस्तरीय मेळाव्यात सहभाग
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
शासनाच्या राज्यस्तरीय एकदिवसीय ‘उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमात चाळीसगावच्या कलावंतांनी सहभाग नोंदवला, हा कार्यक्रम दि.२० फेब्रुवारी रोजी नाशिक येथे संपन्न झाला. त्यात पथनाट्य, लोकगीते, नवसाक्षर गीते, पोवाडा या बरोबर नव साक्षरांसाठी साहित्य निर्मितीच्या प्रदर्शनीचे आयोजन केले गेले . यात चाळीसगावचे उपक्रमशील व कलाप्रेमी शिक्षक शालिग्राम निकम, रतन पांचाळ व रवींद्र बेलदार यांनी नव-साक्षर लोकगीत सादर करून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये विशेष लक्ष वेधून घेतले, या कार्यक्रमातून नव साक्षरांचे प्रबोधन, दैनंदिन आर्थिक व्यवहार, आरोग्य, अन्न, लोकजीवन, संस्कृती व समाजप्रबोधन सामाजिक संदेश पोहोचविण्यात आले यावेळी नव साक्षरांसाठी शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन भरले होते, कार्यक्रमात कलावंतांचा समारंभपूर्वक गौरव करण्यात आले.













