रस्त्यांले पडले भोकं, डोकं फुटून मरतात लोकं.
👉 देवा तुला डोकं आहे की खोकं ❓
👉 संतप्त झालेल्या गडचिराेली जिल्ह्यातील नागरिकांची ओरड.
नागपूर ( चक्रधर मेश्राम) दि. 27/10/2025:- गडचिराेली जिल्ह्यातील रस्ते हे फारच जिवघेणे ठरले आहेत. आरमोरी ते गडचिराेली मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर भोकं पडलेली आहेत.रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हे समजून घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेकदा अपघातात डोकं फुटून अनेकजण मरण पावले आहेत. याबरोबरच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. तरीही गडचिराेली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे पराकोटीने लक्ष देणार का❓ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आणि या गंभीर बाबींकडे लक्ष केंद्रित केले जात नसेल तर ” देवा तुला डोकं आहे की खोकं आणि तुझं जिल्ह्यासाठी पदही खोटं ” ❓अशी म्हणायची वेळ आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यावर अनेक ठिकाणी नादुरुस्त उभी असलेली वाहने आणि नादुरुस्त वाहने , भोकं पडलेल्या रस्त्यांमुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. तसेच दिवसेंदिवस अपघाताची आकडेवारी वाढत आहे. गडचिरोली जिल्ह्यातीलच नव्हे तर सर्वत्र रस्ते अपघातामुळे होणारे मृत्यू आणि जखमी झालेल्यांचे वाढते प्रमाण रस्ते सुरक्षेसाठी गंभीर चिंता झाली आहे. रस्ते अपघातामुळे दर तीन मिनिटांत एक मृत्यू होतो. आणि त्यामुळे भारत जगात अव्वल स्थानावर आहे.. हीच भारत सरकारची नाकर्तेपणाची पावती आहे.
दररोज सकाळी रस्त्यावर झालेल्या अपघाताच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे अनेक रकाने भरलेले असतात. मग हे राज्यकर्ते रोजच सकाळी जागे होऊनही डोळे मिटूनच राहतात का❓रस्ते अपघात ही फारच मोठी शोकांतिका बनली आहे. अपघातात लोकांचा अवेळी मृत्यूच सर्वात मोठं कारणं बनत चालले आहे. या तथ्याकडे कानाडोळा करण परवडणारे नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक सुरक्षेच्या कार्यक्रमात सादर केलेली आकडेवारी अपघाताच्या परिस्थितीचं गांभीर्य अधोरेखित करायला पुरेशी आहे. शाळा आणि महाविद्यालयांजवळ घडलेल्या अपघाताच्या घटना बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत. पुरेशी काळजी अथवा सावधगिरी न बाळगणं, अती वेगाने गाडी चालविणे, हेल्मेट न घालता गाडी चालविणे , रस्ते खड्डेमय असणे, रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने – मार्गाने गाडी चालविणे यासारख्या अनेक कारणांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. आणि त्यात अनेकांना आपला मौलिक जिवही गमावले आहेत. रस्त्यावर बेशिस्त आणि अनियमित रहदारी वाहतुकीसाठी धोकादायक आहे. मोकाट जनावरांचा वावर वाहातुकिसाठी बेभरवशाचे बनले आहे. अरूंद रस्त्यावर घुसखोरी केली गेली असल्याने रस्ते पुन्हा..अरूंद झाले आहेत. मात्र या गंभीर बाबीकडे नगर परिषद प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. गडचिराेली शहरात आणि जिल्ह्यातील इतर अनेक शहरांमध्ये रस्त्यांच्या कडेला छोटे… दुकाने मांडून ठेवल्याने वाहातुकित सावळा गोंधळ सुरू राहातो. रस्ते वाहतूकीचा दर्जा सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक केली असली तरी रस्ते वाहतूक सर्वात धोकादायक ठरली आहे. हे गडचिराेली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विसरून चालणार नाही. रस्ते अपघाताच्या घटना ढिगाने घडत असून जिवितहानी मोठ्या प्रमाणात तर होतेच याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवरही होतो. हे शासनाने लक्षात घेऊन योग्य उपाय योजना आखली पाहिजे. रस्ते बनवितांना स्थपत्य अभियांत्रिकी मध्येही अनेक मुलभूत चुका झाल्या असल्याचे गडकरींनीच मान्य केले आहे. रस्ते बांधकाम करित असतांना सामान हिन, नित्कृष्ट दर्जाचे वापरले जाते. रहदारी नियंत्रण व्यवस्थापन करण्याची यंत्रणा देखील कमजोर झाली आहे. गडचिराेली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील छोट्या..छोट्या रस्त्यांची अवस्था पाहून देवाची किव येते.❓रस्ते उखडले गेले की दुरुस्तीच्या नावावर करोडो रुपये खर्च करूनही अर्धेही भोकं बुजत नाही. दुर्दैवाने अनेक जिव जातात. किती किलोमीटरचे रस्तेबांधणी झाली हे पाहून रस्त्याच्या लांबीनुसार कंत्राटदारांना पैसे दिले जातात. चुकीच्या पद्धतीने रस्ते बांधण्याची कुठल्याही शिक्षा कंत्राटदारांला दिली जात नाही. त्यामुळे अवैज्ञानिक पद्धतीने सुरक्षेचा फारसा विचार न करता कंत्राटदार सर्व नियम बासनात गुंडाळून रस्ते बांधून देतात. यासाठी शासकीय यंत्रणा , लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार आहेत. या गंभीर बाबीकडे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.













