चाळीसगाव येथे औषध विक्रेत्यांचा संपात सहभाग, तहसीलदारांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

चाळीसगाव येथे औषध विक्रेत्यांचा संपात सहभाग, तहसीलदारांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) -: 

अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या (AIOCD) देशव्यापी आंदोलनाला समर्थन देत चाळीसगाव मेडिसिन डिलर्स असोसिएशनतर्फे बुधवार, दि. २० मे रोजी औषध विक्रेत्यांचा बंद पाळण्यात आला या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदनही यावेळी तहसीलदारांना देण्यात आले. शहरात आज सर्वत्र मेडिकल बंद ठेवून चाळीसगाव मेडिकल डीलर्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी चाळीसगावचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन दिले. ऑनलाइन औषध विक्री, ई-पोर्टल आणि इंटरनेट फार्मसीमुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांवर परिणाम होत असल्याचा मुद्दा या निवेदनात मांडण्यात आला आहे. तसेच GSR 817 (E) दिनांक २८ ऑगस्ट २०१८ आणि कोविड काळातील GSR 220 (E) दिनांक २६ मार्च २०२० या अधिसूचनांविरोधातही संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. संघटनेचे म्हणणे आहे की यापूर्वी अनेक वेळा शासनकडे निवेदने देऊनही ठोस निर्णय न झाल्याने हा बंद पुकारण्यात आला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राज्यातील व जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते या आंदोलनात सहभागी झाले असून पुकारण्यात आलेला हा बंद पूर्ण पणे यशस्वी झाले असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या निवेदनावर अध्यक्ष संजय पाटील, सचिव रोशन गुळेचा यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें