शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा अधिक तीव्र 👉घोषणाबाजी, निषेध सभेद्वारे शासनाविरोधात संताप व्यक्त

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा अधिक तीव्र

👉घोषणाबाजी, निषेध सभेद्वारे शासनाविरोधात संताप व्यक्त

गडचिरोली ( चक्रधर मेश्राम) 
महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा आज सहावा दिवस उत्साहात व निर्धाराने पार पडला. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात दिनांक १८ मे २०२६ पासून झाली असून त्याअंतर्गत दि. १९ मे २०२६ रोजी गोंडवाना विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी परीक्षा भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एकत्रित आले.
यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या उदासीन व टाळाटाळ करणाऱ्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत धरणे आंदोलन, निषेध सभा व जोरदार घोषणाबाजी केली. कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा दुसरा टप्पा अधिक तीव्र करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
आंदोलनादरम्यान विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. “भीक नको, हक्क हवा”, “आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा”, “रिक्त पदे भरलीच पाहिजेत”, “१०-२०-३० योजना लागू झालीच पाहिजे” अशा घोषणांद्वारे कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला. यावेळी “लढेंगे… और जितेंगे भी” असा निर्धारही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, दिनांक १४ मे २०२६ पासून सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाची शासन स्तरावर गंभीर दखल घेण्यात आल्याने आंदोलनाला पहिले यश मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. संयुक्त कृती समितीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर उद्या दिनांक २० मे २०२६ रोजी मा. मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या समवेत संयुक्त कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सदर बैठकीमध्ये समितीने शासनाकडे सादर केलेल्या मागणीपत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार असून, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सतिश पडोळे यांनी ही बैठक आंदोलनाच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल असल्याचे सांगितले असून शासनाने कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तथापि, बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्यास नियोजित आंदोलन पुढील टप्प्यांनुसार अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. तसेच बैठकीतील निर्णयाबाबत अधिकृत माहिती सर्व कर्मचाऱ्यांना कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें