साखरवाडीत अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक पोलिसांना निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी

साखरवाडीत अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक पोलिसांना निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी

साखरवाडी प्रतिनिधी 

साखरवाडी येथे गावामध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत सोमवारी (१८ मे २०२६) साखरवाडी पोलिस ठाण्यात निवेदन दिले. गावात जुगार, अवैध दारू विक्री, ताडी, मटका, गांजा तसेच इतर नशा पदार्थांचे व्यवसाय सर्रास सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

          गावातील वाढत्या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून शिक्षण आणि नैतिक मूल्यांपासून दूर जात असल्याची चिंता निवेदनातून व्यक्त करण्यात आली. तसेच गावातील शांतता आणि सुरक्षिततेवर परिणाम होत असून अनेक कुटुंबे आर्थिक व मानसिक अडचणीत सापडत असल्याचेही ग्रामस्थांनी म्हटले आहे. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने गावाचे सामाजिक वातावरण बिघडत चालल्याचा आरोप करण्यात आला.

           या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने तातडीने अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी, संबंधित मुख्य सूत्रधारांवर लक्ष ठेवावे तसेच गावात नियमित पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

      यावेळी निवेदन देताना सागर माने, धनराज जाधव, सचिन बारगळे, अर्जुन मोरे, सुरज साळवे यांच्यासह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें