पोलिसांचा दणका! साखरवाडीत ३ ठिकाणी अवैध व्यवसायांवर फलटण ग्रामीण पोलिसांची छापेमारी
साखरवाडी येथे अवैद्य व्यवसाय ताडी-विक्री हातभट्टी विक्री मटका जुगार अड्ड्यावरती छापा टाकण्यात आला
फलटण प्रतिनिधी
सदर मिळालेल्या माहितीनुसार फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक भुजबळ यांना त्यांच्या खाबऱ्यामार्फत गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार साखरवाडी गावच्या हद्दीत आंबेडकर नगर येथे इसम राजू सुरेश खुडे वय वर्षे ४९ हा कल्याण नावाचा मटका चालवत आहे.यावेळी पोलीस निरीक्षक भुजबळ यांनी पो.कॉ. अमोल देशमुख पो.हवा.पवार पो. हवा.अडसूळ यांना तातडीने त्या ठिकाणी जाऊन शहानिशा करून छापा टाकून कारवाई करण्यास सांगितले असता त्यांनी शहाणीच केली असता आरोपी राजू सुरेश खुडे हा उघड्यावरती पिंपळाच्या झाडाखाली कल्याण नावाचा मटका चालवत असल्याचे निदर्शनास आले.
तसेच साखरवाडी येथील काळुबाई चौक काळुबाई मंदिराच्या पाठीमागे महादेव भैरु मंडले रा. सात सर्कल,साखरवाडी हा पुना नावाचा मटका चालवत असल्याचे समजतात त्याही ठिकाणी पो. हवा. श्रीनाथ उर्फ तात्या कदम पो. उपनिरीक्षक दीपक पवार पो.हवा. महादेव पिसे पो. हवा. अमोल जगदाळे यांना काळुबाई मंदिराच्या पाठीमागील कारखान्याच्या मोकळ्या जागेमध्ये महादेव भैरु मंडले हा पुना नावाचा मटका चालवत असल्याचे निदर्शनास आले.
व साखरवाडी गावच्या हद्दीत बाळासो भीमशप्पा भंडारी वय ५९ वर्षे हा उघड्यावरती विनापरवाना ताडी विक्री करत असल्याचे समजताच पो. हवा नितीन चतुरे व पो.उपनिरीक्षक दीपक पवार पो.हवा महादेव पिसे पो. हवा अडसूळ व पो.हवा जगदाळे यांनी सदरच्या ठिकाणी गेले असता बाळासो भंडारी हा उघड्यावर ताडी-विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. या सर्वांच्या वरती फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई केलेली आहे.
या सर्व घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.महादेव पिसे करीत आहेत.









