चाळीसगाव धुळे मेमू ट्रेन नियमीत करा रयत सेनेची निवेदना द्वारे मागणी
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
चाळीसगाव धुळे मेमु ट्रेन कामकाजासाठी (मेंटेनेस) साठी चार रविवारी बंद असते परंतु माहिती नुसार मेमू चा मेंटेनन्स दर १५ दिवसांनी होतो. त्यामुळे प्रवाशांना दर रविवारी प्रवास करताना असुविधा निर्माण होते, गाडीचा मेंटेनेस ज्या रविवारी केल्या जातो तो रविवार सोडून इतर रविवारी प्रवाशांच्या सुविधेसाठी मेमो गाडी सुरू करून प्रवाशांना रेल्वेने सुविधा उपलब्ध करून द्यावी, किंवा मेमू ट्रेन चा मेंटेनेस चाळीसगाव येथे करण्यात यावा यामुळे आठवड्यातील ३ रविवार मेमू ट्रेन सुरू राहिल्यास विद्यार्थी, व्यापारी वर्ग चाकरमणी प्रवाशांना रेल्वे ची सुविधा उपलब्ध होईल. तसेच चाळीसगाव धुळे दरम्यान भोरस, बोरविहीर, मोहाडी या रेल्वे स्थानकावर पत्र्याचे शेड नसल्यामुळे प्लॉट फार्मवर भर उन्हाळ्यात प्रवाशांना उभे राहणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखे असून उन्हाची प्रचंड दाहकता असल्याने प्लॉट फार्मवर प्रवाशांना पत्र्याचे शेड ची सुविधा उपलब्ध करून देणे हे रेल्वे विभागाचे कर्तव्य आहे तसेच पावसाळ्यात देखील प्लॉट फार्मवर भर पावसात मेनू ट्रेनने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना प्लॉट फार्मवर पावसात भिजत उभे राहावे लागत असल्यामुळे खूप मोठ्या समस्येला प्रवाशांना सामोरे जावे लागत असल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांच्या सुविधेसाठी या तिन्ही रेल्वे स्थानकावर रेल्वे विभागाच्या वतीने लवकरात लवकर पत्र्याचे शेड उभारण्यात यावे. त्यामुळे प्रवाशांना सुविधा उपलब्ध होईल वरील मागण्या या प्रवाशांच्या सुविधे करीता रयत सेनेने केल्या आहेत. रेल्वे विभागाने या मागण्याची पूर्तता लवकरात लवकर करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा रयत सेनेच्या वतीने येत्या १५ दिवसात अप डाऊन करणारे चाकर मनी ,विद्यार्थी , व्यापारी वर्ग तसेच व प्रवाशांना सोबत घेत चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरातील तिकीट ऑफिस जवळ बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी रेल्वे विभागाला दिला आहे, निवेदनावर रयत सेनेचे प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, तालुका अध्यक्ष प्रदीप मराठे, कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष संजय हिरेकर, तालुका अध्यक्ष अनिल कोल्हे, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, शहर अध्यक्ष शिवाजी गवळी, शहर कार्याध्यक्ष प्रकाश गवळी यांच्यासह साहेबराव अहिरे, किरण पवार, शरद पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत,









