अंधशाळेचा कायापालट करण्यासाठी साईभक्तांनी दाखविलेले औदार्य कौतुकास्पदःडॉ. विनायकराव चव्हाण

अंधशाळेचा कायापालट करण्यासाठी साईभक्तांनी दाखविलेले औदार्य कौतुकास्पदःडॉ. विनायकराव चव्हाण

( चाळीसगांव प्रतिनिधी रणधीर जाधव) 

 रा.स.शि.प्र. मंडळ संचलित राष्ट्रीय अंधशाळा चाळीसगाव या शाळेचा दिव्यांग विद्यार्थी हितासाठी कायापालट करून अनेक विविध भौतिक सुविधा शाळेचे नूतनीकरण कलर तसेच तीन अंध विद्यार्थ्यांचे दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करून त्यांना दृष्टी देणारी ठाणे येथील साईभक्त सदाशिव वैद्य सर व साईभक्त श्रीधर चारी सर यांचा सत्कार दिनांक 4/10/2025रोजी संस्थेचे चेअरमन साहेब डॉक्टर विनायकराव यशवंतराव चव्हाण व संस्थेचे सचिव बाळासाहेब विश्वासराव चव्हाण यांच्या हस्ते अंधशाळेत स्मृतीचिन्ह मानपत्र शाल व श्रीफळ तसेच बुके देऊन यथोचित असा सन्मान करून गौरविण्यात आले.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सचिन यशवंतराव सोनवणे यांनी केले तसेच सूत्रसंचालन शाळेचे संगीतशिक्षक श्री. अभय कसबे यांनी केले आभार श्री .संजय घोडेराव यांनी मांडले.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे विशेष शिक्षक आनंद गायकवाड, सर ज्ञानेश्वर अल्हाटे , अशोक पाटील , महेश शिंदे, सर बी के बागुल , तसेच शाळेचे अधीक्षक राजवल्ली जमादार, लिपिक स्नेहा मोरे, काळजीवाहक दत्ता धोटे, राजेंद्र राठोड , शंकर देशमुख, श्री भगवान रील , श्री मनोज पारधी श्रीमती कल्पना पारधी ,राजश्री मगर, व वत्सला मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

     अध्यक्षीय भाषणात संस्थेचे चेअरमन डॉक्टर विनायकराव चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की रा.स.शि.प्र.मंडळाच्या अंधशाळेच्या कायापालट करण्यासाठी औदार्य दाखविणारे साईभक्तांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले. संस्थेच्या वार्षिक सभेत देखील आपण केलेल्या सर्व कामांचा आम्ही उल्लेख केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

   संस्थेचे सचिव श्री.बाळासाहेब विश्वासराव चव्हाण व संचालक सुनिल देशमुख यांनी देखील आपल्या भाषणात श्री सदाशिव वैद्य सर व श्री श्रीधर चारी सर यांनी केलेल्या 50 लक्ष रुपयांच्या सर्व कामांचा उल्लेख करून गौरवोद्द्गार काढले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें