सिंचन भवनाच्या 60 एकर परिसरात वृक्ष लागवड होणार जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा शुभारंभ

सिंचन भवनाच्या 60 एकर परिसरात वृक्ष लागवड होणार

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा शुभारंभ

सातारा, दि.12 : शासनाच्या वृक्ष लागवड व 150 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार जलसंपदा विभागाच्या सिंचन भवनाच्या 60 एकर परिसरात 3 हजार 500 वृक्षांची लावगड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते वृक्षाची लागवड करुन करण्यात आला.

या प्रसंगी उपवनसंरक्षक अमोल सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी मिल्लाकर्जुन माने, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, जयंत शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदर समीर यादव यांच्यासह जलसंदा विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सिंचन भवनाच्या परिसरात आज सुमारे 200 वृक्षांची लागवड करण्यात आली. लागवडीनंतर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या विविध शाखांना भेटी देवून कामाजाची पहाणी केली व समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी जिहे-कठापूर योजनेच्या प्रतिकृतीची पहाणी केली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें