महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनच्या मराठवाड़ा महीला अध्यक्ष पदी ॲड . आशा गोरे
( चाळीसगांव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
चाळीसगांव येथील रहिवासी तथा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करणार्या ॲड. आशा गोरे शिरसाठ यांची महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या मराठवाडा विभागाच्या महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून तसे नियुक्ती पत्र असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. श्री सय्यद सिकंदर अली, कार्याध्यक्ष सचिव ॲड. श्री.यशवंत खराडे, श्री ॲड. सचिव श्री ॲड. प्रवीण नलावडे यांनी दिले आहे, या निवडी बद्दल ॲड. नितेश ललवाणी, ॲड आतिश लांडगे पूणे, ॲड. चंद्रकांत गोरे, आणि डिस्ट्रिक्ट अँड हायकोर्ट लॉयर्स चाळीसगांव वकील संघानेही त्यांचे अभिनंदन केले आहे. दि.9 ऑगस्ट रोजी पुणे (पिंपरी चिंचवड) येथे होऊ घातलेल्या ५ व्या वार्षिक नोटरी अधिवेशनात वकील वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नोटरी असोसिएशनच्या मराठवाडा नूतन अध्यक्षा ॲड. आशा गोरे यांनी केले आहे.










