श्रीदत्त इंडियाचे’ १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट-अजितराव जगताप

श्रीदत्त इंडियाचे’ १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट-अजितराव जगताप

 

फलटण प्रतिनिधी : दि २१ जून २०२५

श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याने आगामी सन २५/ २६ हंगामामध्ये १२ लाख टन उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून त्या अनुषंगाने तोडणी व वाहतूक यंत्रणेची करार प्रक्रिया पार पडली आहे मागील ५ गळीत हंगामात शेतकऱ्यांना वेळच्या वेळी दिलेल्या चोख पेमेंट मुळे १२ लाख टन गाळप होण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन श्री दत्त इंडियाचे साखर कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी कारखान्याच्या ६ व्या मिल रोलर पूजन समारंभ प्रसंगी केले

यावेळी फलटण श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महंत शामसुंदर शास्त्री यांच्या हस्ते विद्युत कळ दाबून मिल रोलर बसवण्याच्या कामाचा शुभारंभ पार पडला तत्पूर्वी रोलर पूजन इंजिनिअरिंग विभागाचे डेप्युटी चीफ इंजिनियर नितीन रणवरे यांच्या हस्ते करण्यात आले

अजितराव जगताप म्हणाले, मागील हंगामा पासून कारखान्याची गाळप क्षमता वाढली असून दैनंदिन ८ हजार ५००क्षमतेने कारखान्याचे गाळप होणार असून शासन निर्णयानुसार कारखाना गाळप सुरू करणार आहे गाळप क्षमता वाढल्याने शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप होण्यास यामुळे मदत होणार आहे त्यामुळे फलटण तालुक्यातील व भागातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यास घालण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला कारखान्याचे संचालक चेतन धारू,चीफ इंजिनिअर अजित कदम, उत्पादनचे व्हॉइस प्रेसिडेंट भारत तावरे, को जन मॅनेजर दिपक मोरे, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी रमेश बागनवर, सीनियर इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर नितीन सुद्रिक, डब्ल्यूटीपी मॅनेजर किरण बुनगे, एच आर सुहास भुसनर, डेप्युटी चीफ इंजिअर किशोर फडतरे, , सुरक्षा अधिकारी अजय कदम,फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले,,सुहास गायकवाड, पोपट भोसले, ग्रा. स. मच्छिंद्र भोसले, संजय जाधव,पै संतोष भोसले, केन सुपरवायझर एस के भोसले, ट्रान्सपोर्ट इनचार्ज नितीन भोसले,परीसरातील शेतकरी,कारखन्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें