माळेगाव कारखान्यासाठी फलटणच्या राजे गटाचा अजितदादांना पाठिंबा ; श्रीमंत संजीवराजेंनी जाहीर केला पाठिंबा

माळेगाव कारखान्यासाठी फलटणच्या राजे गटाचा अजितदादांना पाठिंबा ; श्रीमंत संजीवराजेंनी जाहीर केला पाठिंबा

 

फलटण प्रतिनिधी :

विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये लढत असलेल्या निळकंठेश्वर पॅनलला पाठिंबा दिला असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली फलटण तालुक्यातील गोखळी येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात उभे असणाऱ्या निळकंठेश्वर पॅनलच्या कोपरा प्रचार सभेदरम्यान सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राजे गटाचा पाठिंबा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जाहीर केला आहे .माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक राज्यामध्ये गाजत असताना फलटणच्या राजे गटाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात लढत असलेल्या निळकंठेश्वर पॅनलच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याने फलटण तालुक्यात मध्ये असणाऱ्या मतांना नक्कीच याचा फायदा होणार आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें