छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासाच्या सुवर्ण पानावर इतिहास घडवला – प्रा डॉ साधना निकम

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :- 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी इतिहासाच्या सुवर्ण पानावर इतिहास घडवला आजही त्यांचे विचार समाजाला प्रेरणा देतात आजची लढाई ही रणांगणावर नसून हितशत्रू ओळखून सामोपचाराने समाजाने वाटचाल केली तर महाराष्ट्राची प्रगती निश्चित होणार असल्याचे प्रतिपादन गणेश पवार मित्र मंडळ आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रमात प्रा. डॉ. साधना निकम यांनी केले. गणेश पवार मित्र मंडळाच्या वतीने दि. १९ रोजी शहरातील पवार वाडी स्थित विठ्ठल रुख्मिणी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करून विविध क्षेत्रातील रत्नांचा गौरव व निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन नगरपरिषद उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, प्रस्ताविक गणेश पवार यांनी केले, व्यासपीठावर उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी, जि. प. सदस्य राजेंद्र राठोड, नगरसेवक रामचंद्र जाधव, योगेश खंडेलवाल, मुकेश चौधरी, अभय वाघ, संभाजी गवळी, नगरसेविका हर्षदा पवार, उद्योजक हिराशेठ बजाज, माजी नगरसेवक सदाशिव गवळी तसेच गणेश पवार मित्र मंडळ अध्यक्ष गणेश पवार, सुधीर पाटील, सतीश पवार, गुलाब चव्हाण, सुभाष खैरनार, आनंदा चिपडे, निखिल राठोड, पांडूतात्या शिंगटे, योगेश गव्हाणे, एस. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते, या याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर तनिष्का बाळू पवार, खुशी किरण पवार, मानव मराठे, शौर्य कापडणे, ख्याती कापडणे, काव्यांश देशमुख यांनी भाषणे केली, गणेश पवार मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान पत्र देवून सत्कार करण्यात आले, तसेच निंबध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशश्री क्लासेसचे संचालिका भाग्यश्री तुपे यांनी केले तर आभार बाळासाहेब पवार यांनी मानले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal