चाळीसगाव येथे एका वकीलावर जीवघेणा हल्ला, खाजगी रुग्णालयात उपचार सुरु
चाळीसगाव प्रतिनिधी :- शहरातील न्यायालय परिसरात काल शुक्रवार 20 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका वकीलला मारहान करण्यात आली, घडलेल्या घटनेने मात्र शहरात खळबळ उडाली. न्यायालयीन कामकाज सुरू असताना अॅड. समीर शेख यांच्यावर सात ते आठ अज्ञातांनी हल्ला करत शस्त्राने सपासप वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल 20 रोजी दुपारी घडली, अॅड. समीर शेख हे न्यायालयात परिसरात कामकाज करत असताना अचानक काही जण त्यांच्या जवळ आले. त्यापैकी तिघांनी हातातील धारदार हत्याराने वार केले. हल्ला सुरू होताच न्यायालयात परिसरात एकच गोंधळ उडाला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून इतर वकील बांधव तात्काळ धावले आणि हल्लेखोरांच्या तावडीतून शेख यांची सुटका केली. या हल्ल्यात अॅड. शेख यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेख यांच्यावर बाबजी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. न्यायालयासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरात भर दिवसा झालेल्या या प्रकारामुळे वकील बांधवांमध्ये संतापचे लाट उसळली आहे. चाळीसगाव न्यायालयातील वकिलांनी एकत्र येत या घटनेचा नोंदविला असून वकिलांना संरक्षण देणारा स्वतंत्र कायदा तातडीने लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले.













