मराठा सेवा संघातर्फे तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
( चाळीसगाव प्रतिनिधी प्रतिनिधी रणधीर जाधव): –
चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा सेवा संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला शिवप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
यावेळी शिवकालीन खेळांचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक शौर्य, धैर्य आणि संघभावनेचे दर्शन घडविणाऱ्या या खेळांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रतिभा ताई चव्हाण होत्या. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुधीर आबा पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष हर्षल पाटील, तालुकाध्यक्ष कुणाल पाटील, जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष चेतन देशमुख, राकेश राखुंडे, नगरसेवक दीपक पाटील तसेच मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात एबी हायस्कूलमधील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत, नृत्य व विविध सांस्कृतिक कलागुण सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.













