धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, फलटण विभाग यांच्या वतीने फलटण येथे भव्य ‘रक्तदान महायज्ञ’

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, फलटण विभाग यांच्या वतीने फलटण येथे भव्य ‘रक्तदान महायज्ञ’

फलटण, दि. २० फेब्रुवारी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, फलटण विभाग यांच्या वतीने फलटण येथे भव्य ‘रक्तदान महायज्ञ’ आयोजित करण्यात आला आहे.

रविवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे हा उपक्रम पार पडणार आहे. धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाला अभिवादन म्हणून हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर शिवभक्त, युवक व ग्रामस्थांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे. “विसरू कसे बलिदान, चला करूया रक्तदान” या घोषवाक्याने प्रेरित होऊन अधिकाधिक रक्तदाते सहभागी व्हावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास प्रोत्साहनपर भेट देण्यात येणार असून ऐतिहासिक संदर्भांवर आधारित साहित्यही उपलब्ध देण्यात येणार आहे.

फलटण तालुक्यातील युवकांनी या ‘महायज्ञा’त सहभागी होऊन मानवतेच्या कार्यात हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें