आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभागाचे पथक दिंडीसोबत रवाना

आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभागाचे पथक दिंडीसोबत रवाना

( *चाळीसगांव प्रतिनिधी रणधीर जाधव*)
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी, येथून पंढरपूरकडे निघालेल्या आषाढी वारीतील पायी दिंडी सोबत आरोग्य विभागाचे आरोग्य पथक रवाना आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे, डॉ. नितीन साळुंखे यांच्या नेतृत्वात हे आरोग्य पथक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. या पथकात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य वाहक, चालक तसेच इतर आवश्यक कर्मचारी यांचा समावेश असून संपूर्ण तीस दिवस हे पथक वारकऱ्यांसोबत राहून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणार आहे. पायी चालत अनेक दिवसांचा प्रवास, बदलते हवामान, पावसाळा, थकवा, सर्दी अणि संसर्गजन्य आजार लक्षात घेता आरोग्य विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. वारकऱ्यांसाठी फिरते आरोग्य केंद्र आरोग्य विभागाचे हे विशेष पथक म्हणजे एक फिरते दवाखानाच आहे. दिंडी ज्या ठिकाणी मुकाम करेल, त्या ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध असेल आजारी पडलेल्या वारकऱ्यांची तत्काळ तपासणी, आवश्यक औषधोपचार त्वरित उपचार केले जाणार आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी केवळ उपचारच करणार नाहीत तर आरोग्यविषयक जनजागृती, स्वच्छता अभियान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही विशेष भर दिले जाणार आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवक यांच्या सहकार्याने स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सुरक्षित पिण्याच्या पाण्यामुळे जुलाब, टायफॉईड, कॉलरा यांसारख्या आजारांचा धोका वाहू शकतो. त्यायासाठी पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी, क्लोनिशन, पाण्याचे नमुने तपासणे अणि सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्याचे काम आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार आहे. धूर फवारणीद्वारे डास नियंत्रण पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या डासजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे मुकमाच्या ठिकाणी नियमित धूर फवारणी करण्यात येणार आहे. यामुळे डासांचे प्रमाण कमी होउन संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे, अन्न दूषित होऊ नये यासाठी आरोग्य विभागाकडून अन्नपदार्थांची तपासणी केली जागार आहे. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष उपचार दररोज अनेक किलोमीटर चालल्यामुळे अनेक वारक-यांच्या पायांना फोड येणे, स्नायूदुखी, सांधेदुखी, पाय सुजणे, निर्जलीकरण, धक्या अशा समस्या निर्माण होतात. आरोग्य पथकाकडून अशा बारकऱ्यांना आवश्यक उपचार, मलमपट्टी, औषधे तसेच विगांतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महिला वारक-यांसाठी आवश्यक आरोग्य सुविधा, आरोग्यविषयक समुपदेशन, आवश्यक औषधोपचार तसेच स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वारीदरम्यान आवश्यक औषधसाठा, आपत्कालीन उपचार साहित्य, प्राथमिक उपचार पेठ्या, तापमापक, रक्तदाब मोजण्याची साधने, सलाईन, आवश्यक इंजेक्शन आणि इतर वैद्यकीय साहित्य उपलब्ध ठेवण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. करिष्मा नायर तसेच जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. सचिन भायेकर व तालुका आरोग्य अधिकमी डॉ. प्रशांत बोरसे आणि डॉ. नितीन साळुंखे यांच्या नियोजनामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आरोग्यसेचा तातडीने उपलब्ध होणार आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें