जिंतीतील बिरोबा मंदिर चोरीचा छडा; फलटण ग्रामीण पोलिसांकडून आरोपी जेरबंद मंदिरातील पितळी समई, पितळी घंटा व इतर साहित्य चोरीला; २२ वर्षीय आरोपीला अटक

जिंतीतील बिरोबा मंदिर चोरीचा छडा; फलटण ग्रामीण पोलिसांकडून आरोपी जेरबंद

मंदिरातील पितळी समई, पितळी घंटा व इतर साहित्य चोरीला; २२ वर्षीय आरोपीला अटक

फलटण : जिंती, ता. फलटण येथील हद्दीतील बिरोबा मंदिरात झालेल्या चोरीचा फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत एका संशयित आरोपीला जेरबंद केले आहे. पोलिसांच्या तपासात आरोपीचे नाव जय संजय वेदपाठक (वय २२, रा. पिंपळवाडी, ता. फलटण) असे निष्पन्न झाले असून त्याला अटक करण्यात आली आहे. 

जिंती गावच्या हद्दीतील बिरोबा मंदिरातील मंदिराच्या गाभाऱ्यातील पितळी समई, पितळी घंटा व इतर साहित्य असा एकूण सुमारे ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. ही चोरी दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत झाल्याचे पोलिसांच्या प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

या प्रकरणी फिर्यादी हरिष विठ्ठल कोळपे, रा. कोळपे वस्ती, पिंपळवाडी, ता. फलटण यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३८/२०२६ अन्वये संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहॆ 

गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार राजाराम पिसे यांच्याकडे सोपविण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे गतिमान केली. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे जय संजय वेदपाठक याला निष्पन्न करून दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.२० वाजता अटक करण्यात आली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.

आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दि. ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चोरीच्या मुद्देमालाबाबत तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पुढील तपास सुरू आहे. 

ही कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली. तपासात पोलीस हवालदार राजाराम पिसे, पोलीस हवालदार अडसूळ, पोलीस हवालदार पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल देशमुख यांनी सहभाग घेतला. 

मंदिरातील चोरीचा अवघ्या २४ तासांत छडा लावल्याने फलटण ग्रामीण पोलिसांच्या तपासकौशल्याचे कौतुक होत असून, या प्रकरणातील पुढील तपास पोलीस हवालदार पिसे करीत आहेत

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें