जामनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
बाळू वाघ
जामनेर पोलीस निरीक्षक पदी निवृत्ती बोराडे यांची नियुक्ती; कायदा व सुव्यवस्थेवर देणार भर
जामनेर
जामनेर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदी पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याला आपले प्राथमिक प्राधान्य राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांना पोलीस दलातील प्रदीर्घ सेवेचा आणि प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये आपली सेवा बजावली असून, शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
जामनेर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवणे, अवैध धंद्यांवर वचक बसवणे आणि महिला व बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे या गोष्टींवर त्यांनी भर दिला आहे. तसेच, तालुक्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही नवनियुक्त पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी केले आहे.












