सर्वोदय शिक्षण संस्थेवर संचालकपदी निवड झाल्याबद्दल उमेश करपे व मधुकर गवारे यांचा सत्कार

सर्वोदय शिक्षण संस्थेवर संचालकपदी निवड झाल्याबद्दल उमेश करपे व मधुकर गवारे यांचा सत्कार

चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-

सर्वोदय शिक्षण संस्था, उंबरखेड येथे संचालकपदी निवड झाल्याबद्दल उमेश प्रकाश करपे व मधुकर पुंडलिक गवारे यांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा समाज विकास मंडळ व स्मारक समिती यांच्या वतीने भव्य सत्कार समाजबांधवांच्या उपस्थितीत करण्यात आला. तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा अधिकारी कर्मचारी, शिक्षक डॉक्टर पोलीस दलातील गुणवंतांचा व लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. या सत्कार समारंभाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या गुणवंतांसोबत त्यांच्या परिवारातील सदस्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. सर्वोदय शिक्षण संस्थेवर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल उमेश करपे उर्फ अविभाऊ व मधुकर गवारे यांच्या परिवाराचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करताना उपस्थित समाजबांधवांनी त्यांचे तसेच त्यांच्या परिवाराचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी अध्यक्ष भीमराव चव्हाण, नारायण शेजवळकर, उद्योजक पांडुरंग शिंगटे, संजय कापसे, विनायक मांडोळे, विलास दुशिंग, मधुकर गुंजाळ, नाना तांबे, देविदास जाधव, धनंजय मराठे, सुनील पाटील, रोहित जाधव, भाऊसाहेब जाधव, समाधान एरंडे, राहुल जाधव, लक्ष्मण जाधव, संजय दुशिंग, नितीन गवारे, डॉ. रामकृष्ण पांगारे, प्रल्हाद सावंत यांच्यासह परिसरातील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित जाधव व सुनील पाटील यांनी केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें