फलटण तालुक्यातील वाहनधारकांसाठी विशेष टोल सवलतीची मागणी!

फलटण तालुक्यातील वाहनधारकांसाठी विशेष टोल सवलतीची मागणी!

फलटण प्रतिनिधी: फलटण एस.टी. स्टँडपासून ६० किलोमीटरच्या परिघातील सर्व टोल प्लाझांसाठी फलटण तालुक्यातील सर्व वाहनांना विशेष सवलतीचा एकत्रित वार्षिक टोल पास लागू करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.

फलटणमधून पंढरपूर, पुणे-जेजुरी, इंदापूर-बारामती, दहिवडी तसेच लोणंद-शिरवळ अशा विविध दिशांना रस्त्यांचे जाळे विकसित होत आहे. मात्र या रस्त्यांचा विकास होत असताना स्थानिक नागरिकांना वारंवार टोलचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

सध्याच्या व्यवस्थेतील २० किलोमीटरची स्थानिक पासाची मर्यादा फलटणसारख्या विस्तृत तालुक्यासाठी पुरेशी नसल्याचे खरात यांनी म्हटले आहे.

त्यामुळे फलटण एस.टी. स्टँड केंद्रबिंदू मानून ६० किलोमीटरच्या परिघातील सर्व टोल प्लाझांसाठी एकत्रित स्थानिक वार्षिक पास सुरू करावा. या पासची वार्षिक फी ५०० ते ६०० रुपयांपेक्षा जास्त नसावी, तसेच वाहन टीआर किंवा एनटी आहे यावरून भेदभाव करू नये, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

हा पास एकाच फास्टटॅग किंवा डिजिटल प्रणालीद्वारे लागू करावा आणि भविष्यात या परिघात सुरू होणारे नवीन टोल प्लाझादेखील या योजनेत समाविष्ट करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

“राष्ट्रीय महामार्गांचा विकास — स्थानिक नागरिकांवर आर्थिक अन्याय नको” या भूमिकेतून शासनाने फलटण तालुक्यासाठी विशेष टोल सवलतीचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें