फलटणमध्ये उद्या जनता दरबार; प्रलंबित तक्रारींच्या निरसनासाठी अधिकारी एकाच ठिकाणी

फलटणमध्ये उद्या जनता दरबार; प्रलंबित तक्रारींच्या निरसनासाठी अधिकारी एकाच ठिकाणी

नागरिकांच्या तक्रारींवर थेट सुनावणी; विविध शासकीय विभागांचे अधिकारी राहणार उपस्थित

फलटण | दि. ६ सप्टेंबर २०२६

फलटण तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारात विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर थेट सुनावणी होणार आहे.

फलटण तालुक्यातील ज्या नागरिकांनी विविध शासकीय विभागांकडे आपल्या तक्रारींबाबत यापूर्वी अर्ज केले आहेत, अशा नागरिकांनी जनता दरबाराला उपस्थित राहून आपले प्रश्न मांडावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी

नागरिकांना आपल्या तक्रारींच्या निराकरणासाठी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी जनता दरबारात एकाच ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे प्रलंबित तक्रारींबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवर नागरिकांकडून निवेदने व तक्रारी मांडल्या जाण्याची शक्यता असून, संबंधित विभागांकडून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.

लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्याचे आवाहन

या जनता दरबारासाठी नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सभापती आणि पंचायत समिती सदस्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते व पदाधिकारी यांनीही जनता दरबाराला उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केले आहे. 

प्रलंबित प्रश्न घेऊन नागरिकांनी उपस्थित राहावे

जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ उपलब्ध होत असल्याने, संबंधित तक्रारींचे अर्ज केलेल्या नागरिकांनी दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाराजा मंगल कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

— एव्हीबी माझा

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें