
एकीकडे सहानुभूती तर दुसरीकडे विकास, चाळीसगाव नगरपरिषद निवडणूकीत प्रचारचा जोर वाढला, मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे जनतेचे लक्ष
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
आगामी होऊ घातलेल्या चाळीसगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीचा प्रचार आता रंगतदार अवस्थेत आला असून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभाताई चव्हाण आणि स्व. लोकनेते अनिल दादा देशमुख शहर विकास आघाडी तर्फे पद्मजाताई देशमुख यांच्यात सरळ लडत होत असल्याने आजी माजी आमदारांच्या पत्नींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे प्रचारच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि नेते मंडळी एकमेकांवर आरोपांच्या फेरी झाडत आहे. माजी आमदार स्व. राजीव दादा देशमुख यांच्या अकस्मात निधनाने चाळीसगावच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी अद्याप जाणवत असतानाच, त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या विकास आराखड्याला गती देण्याचा निर्धार पद्मजाताई देशमुख यांनी व्यक्त केला आहे, चाळीसगावच्या प्रगतीसाठी दिलेली आश्वासने आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबत पद्माजाताईंचा ठाम आत्मविश्वास आहे “जनतेचा विश्वासच आमची ताकद, आणि विकासच आमचे ध्येय” या भूमिकेतून त्यांची वाटचाल सुरू असून शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पद्मजा ताईंना मिळत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुक्यासह शहरात केलेल्या विकासाच्या माध्यमातून प्रतिभा चव्हाण ह्या जनतेमध्ये जाऊन मतदारांचा आशीर्वाद मागत आहे. शहरातील मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, शिक्षण व युवकांसाठी नवी संधी निर्माण करण्याचे धोरण त्यांनी मांडले आहे. त्याचबरोबर सर्व घटकांना न्याय देणारे, सर्वसमावेशक प्रशासनाचा ध्यास असा संदेश त्यांच्या प्रचारातून दिला जात आहे. दरम्यान, चाळीसगावमध्ये निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून, समोर येणारी लढत चुरशीची राहणार असल्याचे राजकीय वर्तुळाचा अंदाज आहे. चाळीसगावच्या जनतेचे विश्वास समर्थन आणि विकासाचा मार्ग या तीनही गोष्टींवर यंदाच्या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे; त्यामुळे आगामी काही दिवसांत निवडणुकीतील घडामोडी अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चाळीसगावच्या जनतेचे विश्वास समर्थन आणि विकासाचा मार्ग या तीनही गोष्टींवर यंदाच्या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे, त्यामुळे आगामी काही दिवसांत निवडणुकीतील घडामोडी अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरात रोज नवे प्रचारक्रम, पदयात्रा आणि नागरिक संवादांच्या माध्यमातून पद्मजाताई आणि प्रतिभाताई हे दोघी उमेदवार जनतेशी थेट संवाद साधत आहेत. राजकीय वर्तुळात ही निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर लढली जाणार असल्याचे चित्र जरी स्पष्ट असले तरी माजी आमदार स्व. राजीव दादा देशमुख यांच्या अकस्मात निधनाने जनतेमध्ये पद्मजाताईं देशमुख यांच्याविषयी सहानुभूतीची लाट सर्वत्र बघायला मिळत आहे. हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य आधार बनला आहे. आगामी काही दिवसांत निवडणुकीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.













