निरोप समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम..

निरोप समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम..

” पाडळीकरांच्या स्मरणात राहील असं शैक्षणिक कार्य येथील शिक्षकांचे” – गटविकासधिकारी श्री. अनिल वाघमारे यांचे गौरवोद्गार.

सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे

पाडळी : नुकतच जिल्हा परिषदेच्या पाडळी तालुका खंडाळा शाळेत शिक्षकांचा निरोप समारंभ व विद्यार्थी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ‘पाडळीकरांच्या स्मरणात राहील असे शैक्षणिक कार्य येथील शिक्षकांचे असल्याचे’ गौरवोद्गार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले खंडाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री अनिल वाघमारे यांनी काढले. शाळेच्या सर्वांगीण विकासामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे योगदानही वाखाणण्याजोगे असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.

या शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री. हणमंत धायगुडे सर यांना शिक्षण विस्ताराधिकारी पदी बढती मिळाली , तर शोभा शिंदे, शीतल सोळसकर या उपशिक्षिकांची बदली झाली. या सत्कारमुर्तीना मानपात्र, सन्मानचिन्ह व संपूर्ण पोशाख देऊन सन्मानीत करण्यात आले. दरम्यान तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील विजेते तसेच सातारा जिल्हा प्रज्ञाशोध व अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व बक्षीसे देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

दरम्यान प्रमुख पाहुणे श्री अनिल वाघमारे, सरपंच रेखाताई वाघमारे, अध्यक्ष आबासो धायगुडे व इतर मान्यवर यांनी शाळेच्या दर्शनी भागातील सेल्फी पॉईंट व किलबिल पार्क (बालोद्यान ) याचे भूमिपूजन केले.

यावेळी श्री अनिल वाघमारे यांनी संगणक कक्ष, शालेय परिसर स्वच्छता, बाला पेंटिंग, सुसज्ज क्रिडांगण, नावीन्यपूर्ण प्रयोगशाळा याची पाहणी करताना पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेची क्रीडा क्षेत्राबरोबरच गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. शाळा व ग्रामपंचायतीस सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासित केले.

या कार्यक्रम प्रसंगी अनेक शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सत्कारमूर्ती शिक्षकांबद्दल ऋण व्यक्त केले. सत्कारमूर्तींनीही भारावून टाकणाऱ्या मनोगतांमधून सर्वांना धन्यवाद देत, शाळेला रोख देणगी व वस्तूरूपाने भेट दिली.

यावेळी , गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, विद्यमान सरपंच रेखाताई वाघमारे, ग्रामसेवक पुनम निगडे ,अध्यक्ष आबासो धायगुडे, उपाध्यक्ष हरिभाऊ माने, पत्रकार मोहन बोरकर, शिक्षणप्रेमी सदस्य सचिन निकम, अर्चना कचरे, पूनम धायगुडे, प्रियंका धायगुडे, प्रियंका वाघमारे, मुख्याअनिरुद्ध ,माजी सरपंच लक्ष्मण बरकडे, तंटामुक्ती अध्यक्ष विकास धायगुडे, माजी सरपंच हनुमंत धायगुडे, राजेंद्र बोडरे संतोष बोडरे , निलेश वाघमारे , नानासो धायगुडे, अनिता बरकडे, मल्हारी माने पत्रकार दिलीप वाघमारे , महादेव शेंडगे बापू ,कृष्णा रासकर, महेंद्र पवार, जयश्री ननावरे, पल्लवी रासकर, संदिप धुरगुडे, विशाल गिरी, सुनिल हाडंबर , नवनाथ शिंदे , उपस्थित होते.
सूत्रसंचालन विशाल गिरी यांनी केले तर आभार महेंद्र पवार यांनी मानले

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें