कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना तात्काळ वेतन द्या.
👉 बेशरम, नालायक महाराष्ट्र सरकारला काही लाज… शरम नाही का❓
👉 आगष्ट महिन्यापासून मानधन का रखडले. ❓
नागपूर ( चक्रधर मेश्राम) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मागील अनेक वर्षांपासून अल्पशा मानधनावर अहोरात्र आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मागील ऑगष्ट महिन्यापासून मानधन दिले नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. तरीही महाराष्ट्र राज्य सरकारला जाग येत नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल. महाराष्ट्र राज्य सरकार आणि सध्यास्थितीत आरोग्य सेवा संचालनालयाच्या अधिनस्त काम करीत असलेल्या अधिकाऱ्यांना जनाची….नाही तर मनाचीही नाही..❓ पण मनाचीही लाज वाटत नाही का❓ माहे ऑगष्ट २०२५ पासून वेतन रखडले असल्याने प्रचंड प्रमाणात असंतोष पसरला आहे. अल्पशा मानधनावर अहोरात्र आरोग्य सेवा देऊनही नियमानुसार ठराविक तारखेला वेतन दिले जात नाही. ऑक्टोबर महिन्यचा दुसरा हप्ता संपून गेला तरीही महाराष्ट्र राज्य शासन बेशिस्त आणि बेशरम पद्धतीने वागत आहे.
कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर मानधनात वाढ केली असली तरी आरोग्य कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात अपयशी ठरले आहे. आता पुन्हा परफॉर्मन्स ची जाचक अट पुढे केली आहे. ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा संपला असला तरी ऑगष्ट महिन्यापासून मानधन देण्यासाठी महाराष्ट्र शासन असमर्थ ठरले आहे. मात्र मंत्र्यांना दौरे करण्यासाठी रोज लाखो… करोडो रुपये खर्च केले जात आहेत. नियमित असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचेही वेतन वेळेवर होत नसल्याने उपासमारीची पाळी आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मागील अनेक वर्षांपासून अल्पशा मानधनावर अहोरात्र काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना 15℅ मानधन वाढ दिली असली तरी वेळेवर मानधन मिळत नाही. दिवाळीच्या अगोदर सर्व कर्मचाऱ्यांना थकित मानधन देण्यात यावे. अशा प्रकारचे नियोजन शासनाने तात्काळ करून आरोग्य कर्मचाऱ्यांना होणारा आर्थिक आणि मानसिक त्रास थांबवावा. अन्यथा कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून महाराष्ट्र शासनाचे धिंडवडे काढावे लागेल. धिंडवडे काढण्याची वेळ येऊ नये यासाठी तात्काळ उपाय योजना करून आरोग्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपुर्वी वेतन अदा करावे. अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विधितज्ञ ॲड. शिवाजी डमाळे यांनी महाराष्ट्र राज्य सरकारचे मुख्य सचिवांना, आरोग्य सेवा संचालक मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री , अर्थमंत्री यांंना अती जलद मार्गाने कळविले आहे. उचित कारवाई करुन दिवाळीपुर्वी वेतन दिले नाही तर… ” महाराष्ट्र शासनाचा येत्या रंगपंचमीत फो…..दाच ” बोंबलला जाईल. हे तितकेच खरे!









