खेड बुद्रुक गटात ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
मतदारांकडून ‘आप्पा आप खडे रहो, ‘हम तुम्हारे साथ है’चा नारा
खंडाळा : आबासो धायगुडे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटाकडे तालुक्याचे लक्ष लागले असून येथील निवडणूक चुरशीची ठरणार आहे. माजी आमदार स्व. माधवराव धायगुडे पाटील यांचे नातू ऋषिकेश (आप्पा) धायगुडे पाटील यांनी कित्येक वर्षापासून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सुरू केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटातील मतदार ऋषिकेश आप्पा धायगुडे पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. ‘आप्पा आप खडे रहो, ‘हम तुम्हारे साथ है’ अशी मागणी करताना दिसत आहेत.
ऋषिकेश धायगुडे पाटील यांनी गट तट न पाहता सर्वांना आपलेसे करून सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. सर्वांनाच आपले कुटुंब समजून सर्वांगीण विकास गोरगरीब जनतेची सेवा तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांचा देखील विचार करून सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्व. अविनाश माधवराव धायगुडे पाटील यांना आपले गुरु मानणारे कार्यकर्ते आजदेखील या खेड बुद्रुक गटांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचे सुपुत्र ऋषिकेश धायगुडे पाटील हे खंडाळा तालुक्यामधील विकास कामासाठी अहोरात्र झटत आहेत. स्व. अविनाश धायगुडे पाटील खंडाळा पंचायत समितीचे सभापती, खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे सदस्य असताना गटामध्ये प्रत्येक गावात त्यांनी कायापलट केला आहे. खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटामधील गावांमध्ये ऐतिहासिक लक्षवेधी असे निर्णय त्यांनी घेतली असून या निर्णयाची तालुक्यात चर्चा होताना दिसत आहे.
खंडाळा तालुक्यासह खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये ऋषिकेश धायगुडे पाटील यांची प्रतिमा वाखाण्याजोगी आहे. राजकारणातील बाळकडू व समस्येचे धडे त्यांना घरातूनच मिळाले आहेत. मुरब्बी राजकारण्याप्रमाणे कोणत्याही समस्येचे निराकरण करण्याची कसब गोरगरिबांच्या समस्याचे निराकरण करण्याचे कार्य अवरीतपणे ऋषिकेश धायगुडे पाटील करत आहेत. खेड बुद्रुक गटामधील समस्येचा अभ्यास व समस्यांचे निराकरण करण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले आहे. त्यांच्याकडे अभ्यासू नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.
खेड बुद्रुक गटाचे प्रतिनिधित्व करा
स्व. अविनाश माधवराव धायगुडे पाटील यांना मानणारा खेड बुद्रुक जिल्हा परिषद गट अशी ओळख असणाऱ्या गटाचे नेतृत्व ऋषिकेश आप्पा धायगुडे पाटील यांनी करावे अशी मागणी विरोधी गट सह कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे. कार्यकर्त्यांचा दबाव वाढला असून खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटाची निवडणूक ऋषिकेश धायगुडे पाटील यांनी लढवण्यासाठी कार्यकर्त्यांची मागणी जोर धरत आहे. धायगुडे पाटील यांचे कार्यकर्ते गावोगावी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या खेड बुद्रुक गटाचे प्रतिनिधित्व त्यांनी करावे, अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.









