तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत मोर्वे संघांना उपविजेतेपद

तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत मोर्वे संघांना उपविजेतेपद

खंडाळा प्रतिनिधी: गणेश गुरव

        सातारा जिल्हा क्रीडा विभाग आयोजित खंडाळा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन खंडाळा येथील एकता मैदान या ठिकाणी करण्यात आले आहे.

      या तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये खो खो या क्रिडाप्रकारात गुरुदत ज्ञानपीठ मोर्वे संचलित माध्यमिक विद्यालय मोर्वे शाळेच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने आणि 17 वर्षे वयोगटातील मुलांच्या या दोन्ही संघाने उपविजेतेपद पटकावले. यावेळी खंडाळा तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष व्ही.एन.गाढवे,माजी अध्यक्ष डी. जी गाढवे,आंतरराष्ट्रीय पंच नवनाथ ढमाळ उपस्थित होते.

       विजेत्या संघाचे आणि मार्गदर्शक शिक्षक श्री.दादासाहेब डिंबळे यांचे ,गुरुदत ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव व सर्व संचालक, मोर्वे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा,सदस्य ,मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ मोर्वे यांनी अभिनंदन केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें