बारामतीत जुन्या वादावरून अनेकांवर कोयत्याने हल्ला..

बारामतीत जुन्या वादावरून अनेकांवर कोयत्याने हल्ला..

बारामती(संतोष जाधव):-

बारामतीत खून,खुनाचे प्रयत्न असे सत्र सुरूच असल्याचे मागील काही घटनेवरून दिसून येत आहे, खून, खुनाचा प्रयत्न असे प्रकाराने बारामती व तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसत आहे, नुकताच बारामती तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली या घटनेची फिर्याद अमोल आण्णा चौधर वथ 37 वर्षे व्यवसाय- वॉटर सप्लायर रा. वंजारवाडी चौधरवस्ती ता. बारामती जि. पुणे यांनी दिली याबाबत समजलेली हकीकत अशी की,आरोपी – 1 ऋतिक उर्फ गुड्या मुळिक रा. कुंभरकर यस्ती वंजारवाडी 2) ओम अर्जुन कुचेकर रा. सुर्यनगरी बारामती 3) अली मुजावर रा. रा. कुंभरकर वस्ती वंजारवाडी 4) दिपक भोलनकर रा. रा. कुंभरकर वस्ती वंजारवाडी 5) शुभम वाध रा. मालुसरे वस्ती वंजारवाडी व इतर यांनी जुन्या वादाच्या कारणावरून हल्ला केल्याचं सांगितले,

मी तसेच माझे भाऊ किती 1) भारत गोकुळ चौधर 2) सागर चंद्रकांत चौधर 3) आदित्य सर्जेराव चौधर 4) सुनिल गोरख चौधर सर्व वंजारवाडी ता. बारामती जि पुणे असे आम्ही व इतर आमचे मुले असे नवरात्र उत्सव चालु असल्याने देवीची ज्योत राशीन येथुन मौजे वंजारवाडी येथे दत्त मंदिरासमोर घेउन आलो व सदर मंदिरासमोर आम्ही पुजा पाठ करु पारंपारिक वाद्यावर उत्सव साजरा करित होतो. त्याचवेळी रात्री. 08:30 वा. चे. सुमारास एक चारचाकी गाडी नं. माहित नाही ही आम्ही थांबले ठिकाणी आली व तिचे मधुन काही इसम खाली उतरले त्यात 1 ऋतिक उर्फ गुड्या मुळिक रा. कुंभरकर यस्ती वंजारवाडी 2) ओम अर्जुन कुचेकर रा. सुर्यनगरी बारामती 3) अली मुजावर रा. रा. कुंभरकर वस्ती वंजारवाडी 4) दिपक भोलनकर रा. रा. कुंभरकर वस्ती वंजारवाडी 5) शुभम वाध रा. मालुसरे वस्ती वंजारवाडी व त्यांचेसोबत अनोळखी इसम दोन असे आमचे जवळ आले त्यावेळी त्यांचे हातात लोखंडी कोयते व चाकू अशी हत्यारे होती. आम्ही सर्व जण उभे असताना आमच्यात असलेले जुन्या वादाचे कारणावरुन माझ्या भावकीतील सुनिल गोरख चौधर यास ओम अर्जुन कुचेकर याने त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने सुनिल यांचे अंगावर डाव्या बाजुस कमरेच्या वर जोरात मारुन गंभौर दुखापत करुन मला त्यातील ऋतिक उर्फ गुड्या मुळिक याने त्याचे हातातील लोखंडी कोयत्याने माझे डाव्या हाताच्या मनगटावर गंभीर जखम केली तसेच कमरेच्या डाव्या बाजुस कोयता मारत असताना तो मी हुकविल्याने तो कोयता तेथे घासुन गेला तसेच आमचेतील भारत गोकुळ चौधर यास ऋतिक मुळीक व ओम अर्जुन कुचेकर यांनी त्यांचे हातातील लोखंडी कोयत्याने मारहाण करित असताना ऋतिक मुळिक याने कोयता भारत याचे डावे हाताचे कोपरा जवळ जोरात मारुन तेथे फैक्चर करून गंभिर दुखापत करुन ओम अर्जुन कुचेकर यानेही कोयत्याने उजये हाताचे मनगट जवळ मारहाण करुन दुखापत केली तसेच सागर चंद्रकांत चौधर यास दिपक भोलणकर याने त्याचे हातातील चाकुने सागर यांचे छातीवर उजवेबाजुसजोरात मारुन गंभिर दुखापत करुन डावे काखेच्या बरगडीस दुखापत केली व आदित्य सर्जेराव चौधर यास दिपक भोलणकर याने चौकुने कमरेच्या उजवे बाजुस मारुन दुखापत केली असे आम्हास मारहाण करित असताना त्यांचेतील अली मुजावर याने त्याचे हातातील लोखंडी कोयत्याने भारत गोकुळ चौधर यास मारुन दुखापत केली शुभम वाघ त्याचे हातातील लोखंडी कोयत्याने सुनिल चौधर यास मारहाण करुन दुखापत केली तसेच त्यांचे सोबत आलेले दोन अनोळखी इसम यांनी आम्हास लाथाबुक्यांनी मारहाण करुन आम्हास शिवीगाळ दमदाटी करुन वरिल सर्व जण यांनी 1) ऋतिक उर्फ गुड्या मुळिक रा. कुंभरकर वस्ती वंजारवाडी 2) ओम अर्जुन कुचेकर रा. सुर्यनगरी बारामती 3) अली मुजावर रा. रा. कुंभरकर वस्ती कंजारवाडी 4) दिपक भोलनकर रा. रा. कुंभरकर वस्ती वंजारवाडी 5 शुभम वाघ रा. मालुसरे वस्ती वंजारवाडी अनोळखी इसम दोन यानी त्यांचे हातातील लोखंडी कोयते व चाकू असे हत्यारांनी आम्हास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करुन गंभिर दुखापत केली आहे म्हणून तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल केला असून

तपास पोसई युवराज पाटील करीत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal