सौर ऊर्जा प्रकल्प अंतर्गत सुरू असलेले विद्युत खांब उभारण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध.
लोणंद प्रतिनिधी: आबासो धायगुडे
लोणंद MIDC ते मरिआईची वाडी येथे सौरऊर्जा प्रकल्प अंतर्गत HT लाईन विद्युत खांब उभारण्याचे काम सुरू आहे.या कामास
लोणंद ता.खंडाळा येथील बेंद वस्तीवरील नागरिकांनी विरोध केला आहे.या बाबतचे निवेदन खंडाळा तहसिलदार यांना देण्यात आलेले आहे.दिनांक १ जून रोजी नायब तहसीलदार या कामाची पाहणी करण्यास आले होते.त्यावेळी हे निवेदन नागरिकांनी नायब तहसीलदारांकडे दिले.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,वरील विषयास अनुसरून आपणास विनंती तक्रार तथा हरकत सादर की,
आम्ही सर्व हरकत घेणार नमूद गावचे कायमचे रहिवाशी असून आमची वडिलोपार्जित घरे व शेतजमिनी बेंदवस्ती लोणंद येथे
आहेत.सदर आमच्या मालकी हक्काच्या घरांच्या मोकळ्या जागेतून तसेच शेतजमिनीमधून लोणंद MIDC ते मरिआईची वाडी येथे सौरऊर्जा प्रकल्प अंतर्गत HT लाईन विद्युत खांब उभारण्याचे काम सुरू आहे.सदर विद्युत खांब उभारण्यासाठी आम्हा मूळ मालकांना संबंधित प्रशासन तसेच प्रकल्प ठेकेदार यांनी विश्वासात न घेता आमच्या मालकी हक्काच्या जागेतून विद्युत खांब उभारणे सुरू आहे.या पूर्वीही आमचा विरोध असताना लोणंद विकास आराखडा,MIDC प्रकल्प व इतर कारणास्तव आमच्या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्याने आमच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे.तसेच आता या सौरऊर्जा प्रकल्प अंतर्गत सुरू असलेले विद्युत खांब हे आम्हास विश्वासात न घेता तसेच आमचा विरोध असताना भविष्यात आमच्या तसेच आमच्या कुटुंबियांच्या जीवितास धोका निर्माण होईल.असे प्रकारचे विद्युत प्रकल्प आमच्या मालकी हक्काच्या शेतजमिनी तसेच घरांच्या जवळून अथवा आमच्या मालकी हक्काच्या जमिनीतून न नेता इतरत्र ठिकाणाहून नेण्यात यावे.तरी भविष्यात असे कामकाजास, प्रकल्पास आमचा विरोध असून या विरोधाला न जुमानता प्रकल्पाचे काम स्थानिकांचा विरोध डावलून सुरू करून आम्हास आंदोलन, उपोषण,आत्मदहन करण्यास परावृत्त करू नये.ही विनंती करण्यात आलेली आहे.तरी सदर स्थानिक नागरिकांच्या हरकर्तीचा विचार करून प्रकल्पाचे काम इतरत्र हलवावे हे देखील सांगण्यात आलेले आहे.निवेदनावर
अक्षय क्षीरसागर ,अमोल क्षीरसागर,विकास क्षीरसागर,
तेजस शेळके, संतोष क्षीरसागर, सागर शेळके, सचिन शेळके, संजय क्षीरसागर, विजय शेळके,राहुल क्षीरसागर,सचिनशेळके,रमेश शेळके,दत्तात्रय शेळके,शामराव शेळके ,जयवंत शेळके,आदींच्या सह्या आहेत.हे निवेदन देत वेळी हर्षवर्धन शेळके ,हनुमंत शेळके,विशाल शेळके, अनिल क्षीरसागर,मंगेश क्षीरसागर, सुजित क्षीरसागर, गणेश दणाने,दत्तात्रय शेळके,गोकुळ क्षीरसागर, आदींसह इतरही उपस्थित होते.













